जिल्हाताज्या घडामोडी

कूर येथे वेदगंगा नदीत घेतली तरुणाने उडी: देवकेवाडी गावांत शोककळा :

कूर येथे वेदगंगा नदीत घेतली तरुणाने उडी:

देवकेवाडी गावांत शोककळा :

सिहवाणी ब्युरो / गारगोटी
भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदीच्या पुलावरून शनिवारी रात्री नऊच्या दरम्यान अमित तानाजी रोकडे वय वर्ष २७ रा देवकेवाडी ता भुदरगड या तरुणाने पाण्यात उडी घेतली असल्याची वर्दी भुदरगड पोलिसात अमित यांचा मामा सुरज मारुती वायंगडे यांनी दिली आहे.
कुर येथे वेदगंगा नदीच्या पुलावरून शनिवारी रात्री नऊच्या दरम्यान उडी मारण्यापूर्वी त्यांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आणि आपला मोबाईल नदीत फेकून दिला. त्यांनतर घटनास्थळी नातेवाईकानी धाव घेतली.
त्यानंतर नातेवाईकांनी पोलीस प्रशासनास कळवले त्यांनी रात्रीपासूनच बचाव पथक भुदरगड तालुका प्रशासन तरुणाच्या शोधासाठी प्रयत्न करत आहे. घटना स्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केले. तब्बल १८ तास होऊन देखील शोध न लागल्याने नातेवाईक चिंतेत आहेत. वेदगंगा नदी दू तर्फी भरून वाहत असल्याने शोध कार्यात विलंब लागत असल्याचे बचाव कार्याद्वारे सांगण्यात आले.
घटनास्थळी भुदरगडचे ग्राम महसूल अधिकारी, कूर गावचे रणजीत पाटील दिवसभर बचाव कार्यास मदत करण्यासाठी थांबून होते.
मुरगुड नगरपालिका अग्निशामक दल, कोल्हापूर विभागातील रेस्क्यू फोर्स, भुदरगड तालुका प्रशासन आदी ग्रामस्थ तरुणाचा शोध घेत आहेत. सदर तरुण हा कागल येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता.तो तेथेच वास्तव्यास होता पण त्याने असा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button