क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक : कमी मार्क पडल्याने मुलीला बेदम मारहाण, लेकीने जीव सोडला,: मुख्याधापक पित्याचे कृत्य

धक्कादायक..

कमी मार्क पडल्याने मुलीला बेदम मारहाण, लेकीने जीव सोडला,

मुख्याधापक पित्याचे कृत्य

सिंहवाणी ब्युरो / आटपाडी
बारावीत शिकणाऱ्या मुलीला नीटला कमी मार्क पडल्याच्या रागातून शाळेत माध्यमिक शाळेत मुख्यध्यापक असणाऱ्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीला लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण करत संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली. याप्रकरणी धोंडीराम भोसले या पित्यास अटक करण्यात आली आहे. परीक्षेत कमी गुण कसे पडले? म्हणत धोंडिराम यांनी रागाच्या भरात हा प्रकार केल्याचं समोर आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी,
बारावीत शिकणाऱ्या साधनाला नीट परीक्षेत कमी गुण का मिळाले? असे विचारात माध्यमिक शाळेत मुख्याध्यपक असलेल्या पित्याने मुलीला घरातच लाकडी खुंट्याने मारहाण केली .या मारहाणीतच मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सांगली जिल्ह्यात घडली .आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे साधना भोसले ही विज्ञान शाखेत शिकत होती .नेलकरंजी गावातच खाजगी शिक्षण संस्थेत वडील धोंडीराम भोसले हे मुख्यध्यापक आहेत .बारावीच्या चाचणी परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले .हे कळताच धोंडीराम भोसले प्रचंड संतापले .बारावीतील चाचणी परीक्षेत कमी गुण कसे पडले ?म्हणत धोंडीराम भोसले यांनी रागाच्या भरात साधनाला लाकडी खुंट्याने मारहाण केली .या मारहाणीत साधना ही गंभीर जखमी झाली.मारहाणी मुळे तिची अवस्था इतकी वाईट झाली की तिचा मृत्यू झाला . शुक्रवारी रात्री 9.30च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला . याबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर रविवारी वडील धोंडीराम भोसले यास अटक करण्यात आली आहे .


रुग्णालयात न नेता दुसर्‍या दिवशी सकाळी पित्याने केला योग दिन साजरा


साधना भोसले ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. तिचा नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे तिचे वडील मुख्याध्यक धोंडीराम भोसले हे संतापले होते. साधना ही आपटपाडीमधील विद्यालयात राहत होती. दोन दिवसांपूर्वी ती घरी नेलकरंजी येथे गेली होती. त्यावेळी नीट परिक्षेच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तिला मुख्यापध्यापक पित्याने जात्याच्या लाकडी खुंट्याने रात्री बेदम मारहाण केली होती. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसर्‍या दिवशी सकाळी ते योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. साधनाचे वडील घरी आल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. साधना ही हुशार होती. तिला दहावीमध्ये 95 टक्के गुण मिळाले होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. परंतु केवळ नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुख्याध्यापक वडिलांकडूनच झालेल्या मारहाणीत तिचा हकनाक बळी गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button