गारगोटी कचेरी बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित

गारगोटी कचेरी बचाव आंदोलन तात्पुरते स्थगित
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
गारगोटी येथील ऐतिहासिक कचेरी बचाव आंदोलन स्थगित करण्यात आले आहे . हुतात्मा स्मारक बचाव कृती समितीच्या वतीने गेले बारा दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलन थांबविण्याची विनंती मा .प्रांताधिकारी हरीश सूळ यांनी केली त्याला प्रतिसाद देऊन आंदोलकांची व प्रशासनाची बैठक प्रांत कार्यालय गारगोटी येथे पार पडली यामध्येआंदोलन सुरू असताना देखील कचेरीचे बांधकाम पाडणे सुरूच ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली त्यानंतर गारगोटी येथील स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व व राष्ट्रीय वारसा आंदोलकांनी प्रशासनास पटवून दिला व कचेरी ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून जतन संवर्धन करावे ही मागणी लावून धरली व पर्यायी जागा असताना कचेरी चे बांधकाम का पाडण्यात येत आहे अशी विचारणा केली यावेळी कॉम्रेड रामभाऊ कळंबेकर यांनी येणाऱ्या पिढींना आपण काय वारसा दाखविणार आहोत अशी विचारणा केली तसेच कचेरीचे पाडकाम थांबवून कचेरीचे वारसा स्थळ म्हणून जतन संवर्धन करावे अशी आमची कळकळीची विनंती मान्य करावी असे आवाहन केले मच्छिंद्र मुगडे यांनी हुतात्म्यांच्या वारसदारांनी वारंवार निवेदने देऊनही त्यांच्या निवेदनाची दखल घेतली नसल्याचा उल्लेख केला व हुतात्म्यांच्या वारसांनी पडत असलेल्या कचेरी मधील खिळे आठवण म्हणून जपून ठेवत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिल्याचे सांगितले कॉम्रेड सम्राट मोरे यांनी या प्रश्नावर सकारात्मक निर्णय न झाल्यास 15 ऑगस्ट पर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांकडे त्यांचा नवीन इमारतीचा प्लॅन देखील उपलब्ध नव्हता ते मोकळेच मीटिंगसाठी उपस्थित होते शेवटी आंदोलकांकडे असलेल्या नव्या कचेरीचा प्लॅन प्रांताधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आला व त्यातील त्रुटी आंदोलकांनी पटवून दिल्या तसेच पर्यायी जागेचा वापर करावा या मागणीवर प्रशासन निरुत्तर होताना दिसत होते . प्रांताधिकार्यांनी आंदोलकांचा अभ्यास उत्तम असल्याचे मत व्यक्त केले .तरी देखील आंदोलकांना एक पाऊल मागे येण्याची विनंती केल्यानंतर आंदोलकांनी अजूनही शिल्लक असलेल्या खजिना व त्याला जोडून असलेल्या कस्टडी अशी उजवीकडील पूर्ण बाजू वारसास्थळ म्हणून जतन करता येते व अंदमान येथे असलेल्या सेल्युलर जेल प्रमाणे विकसित करता येत असल्याचे पटवून दिले या मागणीला प्रांताधिकाऱ्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे उजवीकडील बाजू सोडून इतर भाग पाडण्याची परवानगी आंदोलकांनी द्यावी अशी सूचना प्रांताधिकार्यांनी केली ही सूचना आंदोलकांनी मान्य केली . प्रांताधिकार्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला उजवी बाजू सोडून नवीन इमारतीचे बांधकाम करता येते का याची पडताळणी करण्यास सांगितले आहे यावर आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी नेऊन इमारत थोडीशी पूर्वेकडे सरकवल्यास वारसाही जपता येईल व भव्य इमारत होऊन जाईल असा सुवर्ण मध्य मार्ग सांगितला आहे यावेळी कॉ. रामभाऊ कळंबेकर ,काँ .सम्राट मोरे हुतात्म्यांचे वारसदार शंभूराजे वारके,डॉक्टर राजीव चव्हाण राजेंद्र यादव मच्छिंद्र मुगडे मानसिंग देसाई अविनाश शिंदे स्वप्निल साळुंखे दिग्विजय पाटील आशिष कुंभारआदी उपस्थित होते