भुदरगड तालुक्यातील कोंडोशी ल.पा् तलाव भरला : गारगोटीतील रस्ते जलमय ; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

भुदरगड तालुक्यातील कोंडोशी ल.पा् तलाव भरला:
गारगोटीतील रस्ते जलमय ; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
सिहवाणी ब्युरो / गारगोटी :
भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे तर कोंडोशी लघु पाटबंधारे तलाव भरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लीतपणामुळे गारगोटीतील गडहिंग्लज रोडवरील इंजुबाई मंदिर परिसर जलमय झाला आहे.
गेले दोन दिवस तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. कोंडोशी लपा तलाव भरला आहे तर पाटगाव मौनी सागर जलाशयात 63.82 टक्के ( 2 हजार 372.03 द.ल.घ.फू.) इतका पाणीसाठा झाला आहे. मागील 8 तासातील पाऊस 115 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.1 जून 2025 पासून आजपर्यंत 1 हजार 254 मि.मी. पाऊस झाला आहे. वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. यामुळे म्हसवेसह चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबद्दल संताप….
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लीतपणिमुळे गारगोटीतील गडहिंग्लज रोडवरील इंजुबाई मंदिर परिसर जलमय झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयापासूचे सर्व पाणी रस्त्यावरून वाहत आहे. शेळोली रोडवर रस्ताच दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने गटर्स न काढल्याने नागरिकांना रस्त्यावरून साधे चालता देखील येत नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.