राजश्री शाहू जयंती निमित्त छत्रपती शाहूंच्या दुर्मिळ आठवणीच्या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी सकाळी १०वा.

राजश्री शाहू जयंती निमित्त छत्रपती शाहूंच्या दुर्मिळ आठवणीच्या पुस्तकाचे प्रकाशन
गुरुवारी सकाळी १०वा.
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी ता.
उद्या सकाळी श्री शाहू वाचनालय गारगोटी येथे सुप्रसिद्ध चित्रकार पी. सरदार यांनी रेखाटलेल्या छत्रपतींच्या भव्य प्रतिमेची पूजन श्री शाहू वाचनालयाचे विश्वस्त करतील आणि त्यानंतर शंभर वर्षांपूर्वीच्या भगवा झेंडा या साप्ताहिकाचे संपादक दत्ताजीराव यशवंतराव कुरणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित होत आहे अध्यक्षस्थानी रणजीत देसाई निवृत्त डी वाय एस पी आहेत हे पुस्तक सिंहवाणी प्रकाशनने
फक्त शंभर रुपये मध्ये उपलब्ध करून दिले आहे या कार्यक्रमात गडहिंग्लजचे ज्येष्ठ पत्रकार श्री सुभाष धुमे, डॉक्टर सुभाष देसाई वाचनालयाचे कार्यवाह टीबी पाटील हे बोलतील.
या पुस्तकात पी बी साळुंखे यांनी प्रस्तावना लिहिली असून यात जगद्गुरु सदाशिवराव बेनाडीकर ,दरबार सर्जन डॉक्टर धनवडे ,बुगडे कृष्णराव सोहनी मास्तर अशा अनेक मान्यवरांच्या आजपर्यंतच्या दुर्मिळ आठवणी या पुस्तकात संग्रहित आहेत त्यामुळे हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आणि संग्राह्य बनले आहे
(संपर्क- डॉ सुभाष के देसाई.
सिंहवाणी प्रकाशन.
के डी देसाई कॉलनी गारगोटी 416 209.)