जिल्हाताज्या घडामोडी

कनवाड येथे कृष्णा नदीकाठची आकरा एकर शेतजमीन गेली वाहून : मातीचा तात्पुरता बांध न काढल्याचा परिणाम

कनवाड येथे कृष्णा नदीकाठची आकरा एकर शेतजमीन गेली वाहून

मातीचा तात्पुरता बांध न काढल्याचा परिणाम

सिंहवाणी ब्युरो / कुरुंदवाड:
कनवाड (ता. शिरोळ) येथे बंधाऱ्याच्या बांधकामामुळे कृष्णा नदीकाठचीशेती वाहून गेली आहे. ११ एकर जमीन वाहून गेल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मोजणीनंतर जमिनीचे क्षेत्र समजणार आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. बंधारा कामामुळे शेती वाहून गेल्यामुळे नुकसानभरपाई मिळेपर्यंत बंधाऱ्याच्या काम सुरू करू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.कनवाड परिसरात म्हैसाळ-कनवाड बंधाऱ्याचे काम सुरू आहे. या कामासाठी म्हैसाळ हद्दीत नदीच्या पात्रात मातीचा तात्पुरता बांध उभारला होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तो बांध काढणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे नदीचे पात्र बदलल्याने गट नं. १७५ ते २०० मधील शेतजमीन वाहून गेली आहे. शिवाय या शेतीमध्ये असलेला पाणी मोजणारा मनोरादेखील कोसळला आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button