मराठी भाषेचा विस्तार जगभर होण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज : डॉ. उदय शिंदे : भुदरगड मराठी अध्यापक संघाचा गुणगौरव समारंभ

मराठी भाषेचा विस्तार जगभर होण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज : डॉ. उदय शिंदे
: भुदरगड मराठी अध्यापक संघाचा गुणगौरव समारंभ
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
मराठी ही केवळ बोलीभाषा नव्हे, तर ज्ञानभाषा व्हावी, ती जगभर पसरली पाहिजे यासाठी जागतिक विस्तारासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत प्राचार्य डॉ. उदय शिंदे यांनी केले. ते येथील उदाजीराव अध्यापक विद्यालयात
भुदरगड मराठी अध्यापक संघातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुणगौरव समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे होते. कोजिमचे अध्यक्ष राजेंद्र पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. शिंदे पुढे बोलताना म्हणाले मराठी भाषेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे असून, आपल्या मातृभाषेचे ज्ञान अन्य जागतिक भाषांमध्ये पोहोचले पाहिजे. भाषेतील आव्हानांचा सामोरा जाताना आपण आपल्या भाषेची समृद्धी जोपासली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले
गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे म्हणाले, मराठी भाषेत करीअर करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
भाषेचा अभिमान ठेवत तिला अधिक बळकट करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रयत्न व्हावेत.
गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे म्हणाले, मराठी ही माझी शान आहे, माझा आत्मसन्मान आहे,” हे प्रत्येक मराठी माणसाने लक्षात ठेवावे. आपल्या भाषा, संस्कृती आणि परंपरांचे जतन हेच खरे राष्ट्रसेवेचे कार्य आहे.
स्वागत व प्रास्ताविक भुदरगड मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एम.एस.पाटील यांनी केले.कार्यक्रमात तालुक्यातील प्रत्येक शाळेत मराठी विषयात प्रथम आलेले ५० विद्यार्थ्याबरोबरच शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीबद्दल प्रा.सुधीर गुरव व रामकृष्ण गवाणकर,प्रकाश कडव, प्रश्नपेढी निर्मितीसाठी मुख्याध्यापक सागर पाटील, पालीभाषा अभ्यासक गुलाब लांडगे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबासाहेब माने,मुख्याध्यापक संघ उपाध्यपदी निवड झालेबद्दल संतोष भोसले व कार्याध्यक्ष डॉ. एस.बी.शिंदे आदींना सन्माचिन्ह देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमास प्राचार्या मंजुषा माळी,कोजिमाशीचे संचालक पी.एस. हाळदकर, जिल्हा मुख्याध्यापक संघ संचालक निशिकांत चव्हाण, शिक्षक संघटना अध्यक्ष अभिजित पोवार, मारुती लाड, सुभाष पाटील आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन युवराज बिरंबोळे व आभार आक्काताई नलवडे यांनी मानले.
—————————————————
फोटो:
भुदरगड मराठी अध्यापक संघामार्फत आयोजितकेलेल्या कार्यक्रमात बोलताना डॉ. उदय शिंदे, व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे, प्रबोध कांबळे, राजेंद्र पाटील आदी.