ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*राज्यातील प्राध्यापक भरती संदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करावी – प्रा. जोतीराम सोरटे यांची मागणी.* 4435 पदांचा प्राध्यापक भरतीचा प्रस्ताव वित्त विभागात रखडला –


*राज्यातील प्राध्यापक भरती संदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करावी :

प्रा. जोतीराम सोरटे यांची मागणी.*:

4435 पदांचा प्राध्यापक भरतीचा प्रस्ताव वित्त विभागात रखडला –


सिंहवाणी ब्युरो / गारगोटी – 
राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून ठप्प असून हजारो NET/SET, Ph.D. पात्र उमेदवार बेरोजगारीच्या खाईत लोटले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने २०१२ पासूनच्या सर्व भरती प्रक्रियेबाबत ‘श्वेतपत्रिका’ प्रसिद्ध करावी व पारदर्शकता आणावी, अशी जोरदार मागणी NET/SET, Ph.D. धारक संघर्ष समितीने केली आहे.

२०१२ पासून राज्यात प्राध्यापक भरती अनियमित आणि थांबलेली आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष समितीने आजवर ९ सत्याग्रह आंदोलनं आणि ५ पदयात्रा काढल्या असूनही सरकारकडून अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, अशी माहिती समितीचे समन्वयक प्रा. जोतिराम सोरटे ( गारगोटी, जि. कोल्हापूर) यांनी दिली.

सध्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 4435 प्राध्यापक पदांची भरती करण्याचा प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाहीसाठी वित्त विभागाकडे चार-पाच महिन्यांपूर्वी पाठवला आहे, मात्र तो प्रस्ताव अद्यापही मंजुरीविना धूळ खात पडून आहे. वित्त विभागाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, ही बाब गंभीर असून यावर तातडीने खुलासा होणे आवश्यक आहे, असे समितीने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर समितीने सरकारकडे खालील मागण्या केल्या आहेत:

*२०१२ पासूनच्या सर्व प्राध्यापक भरतींचा तपशील व खुलासा करणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी* .

*NEP-2020 राज्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे त्या संदर्भात मनुष्यबळाची काय तरतूद करणेत आली आहे ?*

*सध्या प्रलंबित असलेल्या 4435 प्राध्यापक पदांच्या भरती प्रस्तावाला तात्काळ मंजुरी द्यावी.*

*यासंदर्भात सरकारची भूमिका चालू अधिवेशनात स्पष्ट करावी.*

शासनाने जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही समितीने दिला आहे. ह्यासंदर्भात सरकारकडे अधिकृत लेखी मागणी करणार असलेचे प्रा.सोरटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button