देवचंद महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार : देवचंदच्या चार विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसर पदी निवड

देवचंद महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार
देवचंदच्या चार विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसर पदी निवड
सिंहवाणी ब्युरो / निपाणी
देवचंद महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशन यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. या करारांतर्गत संगणकशास्त्र विभागातील चार विद्यार्थ्यांची क्विक हील फाउंडेशन, पुणे तर्फे क्लब ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली. क्लब ऑफिसर म्हणून निवड झालेलले ०४ विद्यार्थी व १६ सायबर वॉरियर्स असे एकूण २० विद्यार्थी ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
संगणकशास्त्र विभागातील अथर्व माने (प्रेसिडेंट), श्रावणी पवार (सेक्रेटरी), आलोक कांबळे (मीडिया डायरेक्टर), रुद्र सुतार (कम्युनिटी डायरेक्टर) आणि प्रा. प्रशांत कुंभार यांची या उपक्रमासाठी समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग व ओरीएंटेशन विमाननगर (पुणे) येथील कंपनीच्या ऑफिसमध्ये पार पडले. ट्रेनिंगसेशन दरम्यान श्री. अजय शिर्के, गायत्री केसकर-पवार आणि दिपू सिंग यांनी मार्गदर्शन केले. कंपनीच्या अध्यक्षा अनुपमा काटकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाठत आहे. याबरोबरचं ऑनलाईन जीवनात सायबर अपराध्यांच्याही संख्येत मोठी वाठ होत आहे. आणि त्यासाठीच देवचंद कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली. या चार ऑफिसरच्या नेतृत्वात १६ सायबर वॉरियर्स महाविद्यालयाच्यापरिसरातील शाळा, महाविद्यालये तसेच समाजातील विविध घटकांना सायबर सुरक्षेबाबत धडे देणार आहेत.
या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून, मागील दोन्ही वर्षात या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी विविध पुरस्कार पटकावले आहेत. मागील वर्षी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. आशिषभाई शाह, आणि उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. जी. डी. इंगळे व उपप्राचार्य डॉ. आर. के. दिवाकर यांचे मार्गदर्शन मिळाले