भुदरगड तालुका सेवानिवृत्त कर्मचारी मेळावा संपन्न : शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित

भुदरगड तालुका सेवानिवृत्त कर्मचारी मेळावा संपन्न :
शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
भुदरगड तालुका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाहू वाचनालय गारगोटी येथे आज शुक्रवारी निवृत्त वेतन व निवृत्तीवेतन सुधारणा अधिनियम 2025 या विषयावर विचार विनिमय करण्यासाठी भुदरगड तालुक्यातील शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक डी एस देसाई यांनी केले. डी डी. कडव यांनी या विषयाच्या संदर्भात वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्या सर्वांच्या निदर्शनास आणून दिल्या.
अरुण पाटील यांनी या पेन्शन विरोधी कायद्याच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी भुदरगड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक संघ तयार असल्याचे सुचित केले. एम एम कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख मार्गदर्शक व मेळाव्याचे अध्यक्ष डॉक्टर अर्जुन कुंभार यांनी सर्व सेवानिवृत्त संघटना एकत्र आल्याबद्दल अभिनंदन केले.आपल्या मनोगतात ते म्हणाले पेन्शन ही सामाजिक सुरक्षितता
आहे. घटनेने पेन्शनचा अधिकार दिला आहे ती सरकारची कृपा नव्हे. हा चरितार्थाचा अधिकार काढून घेणे घटनाविरोधी आहे. त्यामुळे सर्वांनी सावध राहून संघर्षाची तयारी केली पाहिजे. डॉक्टर कुंभार यांनी वृत्तपत्र आणि समाज माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष येऊ घातलेल्या वेतन सुधार कायदा 2025 संबंधी तरतुदी बाबत निर्माण होत असलेले संभ्रम गैरसमज, शक्यता आणि वास्तव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. न्यायालयात जाण्यासाठी निर्बंध म्हणजे लोकशाही मूल्यावर गदा असून संपूर्ण नियंत्रण सरकारकडे व कायद्याचे संभाव्य दुष्परिणाम या मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतला. त्याचबरोबर जन सुरक्षा सुधारित विधेयक 2025 याबाबत बाबनिहाय सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
सदर मेळाव्याला बी. एस. .माने , शिवाजीराव हवालदार, पी.एस.कांबळे ,आनंदराव जाधव , आनंदराव देसाई, के.टी. कांबळे, बबन तोरस्कर, यशवंत सरदेसाई, आर. के. देसाई, पी.जी.केणे, डी. डी. पाटील ,एस.एम.पाटील डी.बी नलवडे, एस. पी. पाटील, रवी पाठक , मारूती लाड,सर्व विभागाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार एम. एस. मोरस्कर यांनी केले. सूत्रसंचालन टी. बी.पाटील यांनी केले