अभिनव चटका लावणारा मृत्यू, नेत्रदान करून कुटुंबीयांनी जपले सामाजिक भान.

अभिनव चटका लावणारा मृत्यू, नेत्रदान करून कुटुंबीयांनी जपले सामाजिक भान
सिंहवाणी ब्युरो: शैलेंद्र उळेगड्डी, कडगाव
कडगाव (ता. भुदरगड )येथील अभिनव आनंदा कांबळे (वय १७)याचे अकाली निधन झाले.उच्चपदस्त अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिलेला अभिनव हा बालपणी पासून फार हुशार व हरहुन्नरी होता, त्याच्या आई वडिलांनी देखील त्याच्या प्रत्येक आवडी, निवडी पूर्ण करण्यात कधीच हात आखडता घेतला नाही.स्विमिंग, स्केटिंग, कराटे, वृक्तृत्व, स्कॉलरशिप, नवोदय,शालेय व स्थानिक विविध स्पर्धा मध्ये अभिनव नेहमी पुढे राहायचा. त्याच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब पाहडासारखे उभे असायचे.अशा हुशार विदर्थ्यांच्या मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याचे नेत्रदान करून सामाजिक भान जपून समजासमोर एक आदर्श निर्माण केला.
या हसतमुख कुटुंबाला कोणाची तरी दृष्ट लागली व चार दिवसापूर्वी अभिनवचा गडहिंग्लज येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. कांबळे कुटुंबासह संपूर्ण कडगाव गावावर शोककळा पसरली.कुटुंब, मित्रपरिवार गाव गल्ली सर्वांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ग्रामीण भागातील बहुतांशी विध्यार्थी सध्या स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याची स्वप्ने पाहून प्रचंड मेहनत घेत आहेत. अभिनव कांबळे हा सुद्धा त्या पैकीच एक होता. त्याने स्कॉलरशिप व नवोदय या परीक्षा मध्ये उज्वल यश मिळवले होते. त्याचे वडील आनंदा कांबळे हे इंजनियर आहेत. चुलते सुनील कांबळे शिक्षक आहेत.अभिनव वर गडहिंग्लज येथे गेली चार दिवस उपचार चालू होते. त्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर मोठे संकट उभा राहिले परंतु कांबळे कुटुंबियांनी अशा दुःखद प्रसंगात ही सामाजिक भान जपत त्याचे नेत्रदान केले.नेत्रदानातून अभिनवच्या स्मृती मागे राहिल्या आहेत.भुदरगड तालुक्यातील हे दुसरे तर कडगाव परिसरातील हे पाहिले नेत्रदान आहे. अभिनव च्या पश्चात आई, वडील व बहीण आहे. कडगाव परिसरात अभिनव च्या मृत्यूने प्रचंड हळ हळ व्यक्त होत आहे.