सहकार चळवळ सशक्त होण्यासाठी संस्कार आणि प्रशिक्षण महत्वाचे – आनंद चव्हाण

सहकार चळवळ सशक्त होण्यासाठी संस्कार आणि प्रशिक्षण महत्वाचे
– आनंद चव्हाण
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
सहकार चळवळीला मोठा इतिहास आहे, यातून अनेक घटकांचा आर्थिक विकास होतो, त्यामुळे सहकार चळवळ अधिक जोमाने वाढण्यासाठी या क्षेत्रात संस्कार आणि प्रशिक्षण महत्वाचे आहे, असे मत सहकार भारतीचे भुदरगड तालुकाध्यक्ष प्रा. आनंद चव्हाण यांनी व्यक्त केले.
गारगोटी येथे भुदरगड तालुका सहकार विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात चव्हाण बोलत होते, अध्यक्षस्थानी भुदरगड तालुक्याचे सहाय्य्क निबंधक संदिप शिंदे होते,
प्रा चव्हाण पुढे म्हणाले की,जागतिक पातळीवर सहकार चळवळीला शतकाचा इतिहास असून कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी यांना योग्य प्रशिक्षण, पारदर्शी कायदे, नि:संदीग्ध निवडणूक प्रक्रिया, सर्वसमावेशक सभासद नोंद प्रक्रिया, नियमित आर्थिक लेखापारीक्षण या माध्यमातून सहकार चळवळ अधिक सशक्त होईल.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक शरद जाधव यांनी केले.
यावेळी सहा निबंधक संदिप शिंदे,सहकार भारतीच्या तालुका महिला प्रमुख सौ. अश्विनी राहुल हरळीकर यांचेही भाषण झाले. या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी आर. एन.पाटील,व्यवस्थापक विजय शिंदे, आगम यांचे सह तालुक्यातील सर्व सेवा संस्थांचे गटसचिव, सहकारी संस्थांचे अधिकारी उपस्थित होते,शेवटी वेदगंगा बझार चे व्यवस्थापक बाळासाहेब देसाई यांनी आभार मानले.आज जागतिक सहकार दिनानिमित्त आज सकाळी झेंडावंदन सहा. निबंधक संदिप शिंदे यांचे हस्ते झाले, दुपारी सभासदांसाठी तक्रार निवारण शिबीर झाले.व शहरातून सहकार दिंडी आयोजित करण्यात आली होती.
फोटो
–गारगोटी येथे जागतिक सहकार सप्ताहानिमित्ताने व्याख्यानात बोलतांना प्रा आनंद चव्हाण, बाजूस सहा. निबंधक संदिप शिंदे आदी