संजीवन विद्यालय प्रशालेत गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

संजीवन विद्यालय प्रशालेत गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
सिंहवाणी ब्युरो / पन्हाळा :
येथील संजीवन विद्यालय या निवासी प्रशालेत गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ प्राचार्य महेश पाटील, वरिष्ठ समन्वयक सचिन इनामदार व सर्व शिक्षक यांच्या हस्ते गुरूप्रतिमा आणि ग्रंथ पूजनाने करण्यात आला.
विद्यार्थी प्रणव गायकवाड व विद्यार्थीनी प्रणाली सरगर यांनी कवितावाचन केले. संगीत वृंदाने सुश्राव्य गीताद्वारे
गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा समयोचित सत्कार केला.
या सोहळ्यात शिक्षिका शकुंतला कुंभार व कनिष्ठ समन्वयक सुगंध देवकुळे यांनी आपल्या भाषणातून गुरूंचे महत्त्व अधोरेखित केले.
प्राचार्य महेश पाटील यांनी आपल्या संस्कृतीत असलेल्या गुरू शिष्य परंपरेचा आढावा घेतला व गुरूबद्दल आदराची भावना वृद्धिंगत व्हावी असे विचार मांडले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी तर आभार अमोल सुतार यांनी मानले