गडहिंग्लजला ‘शक्तिपीठ विरोधात रास्ता रोको’ ; माजी खा. राजू शेट्टी, माजी आम. राजेश पाटील यांच्यासह 200 जणांना अटक

गडहिंग्लजला ‘शक्तिपीठ विरोधात रास्ता रोको’ ;
माजी खा. राजू शेट्टी, माजी आम. राजेश पाटील यांच्यासह 200 जणांना अटक
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज
चंदगड मतदारसंघातून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग नेण्याच्या आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागणीचे संताप्न पडसाद गडहिंग्लज मध्ये उमटले, संकेश्वर-बांदा महामार्गावर ठाण मांडून सर्वपक्षीय नेते व कार्यकत्यांचा शक्तिपीठ रोको’ केला. शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या झेंड्याखाली हा लढा उभारण्यात आला आहे.
माजी खा. राजू शेट्टी , माजी आम. राजेश पाटील, माजी नगराध्यक्ष
स्वाती शिंदे कोरी, संग्राम कुपेकर,कॉं. संपत देसाई, प्रकाश पाटील, राजेंद्र गड्यान्नावर, नितीन पाटील, अमर चव्हाण सुनील शिंत्रे , नागेश चौगुले, जयसिंग चव्हाण, विद्याधर गुरबे, बाळेश नाईक, सम्राट मोरे यांनी आम. शिवाजी पाटील यांच्यावर चौफेर टीका केली. शक्तिपीठ प्रश्नी जोरदार आंदोलन करून सत्ताधारी व त्यांच्या समर्थक आमदारांनाही सळो की पळो करून सोडले जाईल असा इशारा दिला. केवळ कमिशन मिळविण्यासाठी आमदार शिवाजी पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांना खुष करण्याकरिता उद्योग चालविला आहे.
राजू शेट्टी म्हणाले, राज्यातील ठेकेदारांची 80 हजार कोटींची बिले थकली आहेत. शेतकरी लाभार्थी अनुदान थकित आहे. याबाबत विधानसभा अधिवेशनात आवाज उठण्याची गरजेचे असताना आम. शिवाजी पाटील यांनी शेतकर्यांच्या संसारा वर नांगर फिरवण्याचा उद्योग चालविला आहे. शक्तिपीठ महा मार्गाच्या माध्यमातून कोट्यावधीची माया मिळवि न्यासाठी आमदाराची धडपड सुरू आहे. सक्ती केल्यास शेतकरी रस्त्यावर रक्त सांडतील असा ईशारा देखील दिला.
*शेतकरीच त्या आमदाराला उचलून आपटतील*
कोणालाही आपटण्यासाठी आधी उचलावे लागते. आता उचलण्याची प्रक्रिया पार पडली आहे शक्तिपीठाची मागणी मागे नाही घेतली तर शेतकरीच आमदाराला आपटतील असे मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्ग विरोधात गडहिंग्लज उपविभागातील आजरा , चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड तालुक्यातील शेतकरी आणि विविध राजकीय पक्ष, संघटना पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.