प्रवीण दादांवरील शाई फेक घटनेचा भुदरगड मध्ये निषेध

प्रवीण दादांवरील शाई फेक घटनेचा भुदरगड मध्ये निषेध
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथे गेले असता त्यांच्यावर गावगुंडांनी हल्ला करून त्यांच्यावर शाई फेकली या घटनेचा निषेध भुदरगड येथील पुरोगामी विचार मंच तसेच सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने करण्यात आला यावेळी बोलताना कॉम्रेड सम्राट मोरे म्हणाले संभाजी ब्रिगेडमुळेचछत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर आला आहे 23 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या संघटनेच्या नावात बदल करावा हे आत्ताच कसे काय सुचते ? आणि हल्ला करणारा हा इसम पोलीस रेकॉर्ड वरील गुंड असल्याचे सिद्ध झाले आहे संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेबपाटील म्हणाले की संभाजी ब्रिगेड समोरून आलेल्या कोणत्याही भाषेत उत्तर देण्यास समर्थ आहे .जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी झाला प्रकार हा हल्लेखोरांच्या आका च्या शेवटाची सुरुवात असल्याचे सांगितले या निषेध सभेसाठी शिवश्री मानसिंग देसाई , जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शहाजी देसाई, जिल्हा कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ, राजेंद्र रत्नाबाई बळवंत, अविनाश शिंदे, धनराज चव्हाण, आशिष कुंभार, कृष्णा भारतीय , मोहन कोळवणकर, सुनील चव्हाण, जयदीप पवार , कॉ. रामभाऊ कळंबेकर, धनंजय धर्मरक्षी, महावीर मोहिरे, हर्ष मेंगाने, राजू देसाई, धनराज चव्हाण मानसिंग देसाई रणजीत आरडे शहाजी देसाई सर संदीप देसाई आदी उपस्थित होते
।