श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हाय. व ज्युनि.कॉलेजमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात कु.आर्या आरेकर विद्यार्थिनी प्रतिनिधी

श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हाय. व ज्युनि.कॉलेजमध्ये
शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात
कु.आर्या आरेकर विद्यार्थिनी प्रतिनिधी
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुल गारगोटीच्या श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हाय. व ज्युनि.कॉलेज गारगोटी प्रशालेमध्ये नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत ला भेट,सहकारी बँक, पोलीस ठाणे भेट देऊन त्याठिकाणी कसे काम चालते हे पहिले होते.
या शैक्षणिक वर्षासाठी लोकशाही पद्धतीनुसार शालेय मंत्रिमंडळ निवडणूका गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आल्या. देशातील निवडणूक प्रक्रिया शालेय वयात समजावी यासाठी उमेदवारी अर्ज मागविण्यापासून ते निकाल लागेपर्यंतच्या सर्व बाबी विद्यार्थ्यांना निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमधूनच देशाचे भावी नेतृत्व विकसित व्हावे म्हणून शालेय मंत्रिमंडळ निवडणूक या उपक्रमाचे प्रशालेमध्ये आयोजन करण्यात आले होते. या निवडणूकीत प्रशालेच्या इयत्ता ५ वी ते १० वी च्या सर्व विद्यार्थीनिनी मतदार म्हणून सहभाग नोंदवला.
वर्गप्रतिनिधी या पदासाठी इयत्ता ५ वी ते १० वी च्या २१ उमेदवारांनी व शालेय विद्यार्थिनी प्रतिनिधी या पदासाठी इयत्ता १० वी च्या ३ उमेदवारांनी अशा एकूण २४ उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केला होता.
या निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे उमेदवारी अर्ज मागवणे, अर्ज दाखल करणे , त्याची छाननी करणे, अर्ज माघार घेणे, मतपत्रिका तयार करणे तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची सर्व कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या तसेच मतदानानंतर मतमोजणी, अंतिम निकाल या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थीनिनी आनंदाने सहभागी झाल्या व सर्व कामे यशस्वीरीत्या पार पडली. यातून इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी कु.आर्या दत्तात्रय आरेकर हीची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून बहुमताने निवड झाली.
निवडणुकीची ही सर्व प्रक्रिया साठी कॅम्पस डायरेक्टर डॉ.अभिजित माने सर याचे प्रोत्साहन लाभले. मुख्याध्यापिका सौ.आर.बी.पाटील,सुशांत माळवी,सुनिल कासार,मंदाकिनी कासारीकर, अश्विनी पाटील, संतोष पाटील,अनिल शिरगे,रमजान नाईकवाडे, राजेंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थीनिनीच्या सहभागाने यशस्वीरीत्या पार पाडली.