बिद्री कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी जीवन पाटील

बिद्री कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी जीवन पाटील
सिंहवाणी ब्युरो / महेश पाटील, चंद्रे
बिद्री (ता.कागल )येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी जीवन पाटील( रा. कुर ता. भुदरगड) यांची एकमताने निवड करण्यात आली. कारखान्याच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडसभेच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते.
बिद्रीच्या निवडणूकीत वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील, बिद्रीचे अध्यक्ष के .पी. पाटील, कालावधीत त्यांना स्वीकृत करण्याचा शब्द आघाडीच्या नेतेमंडळींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी बंद पाकीटातून गोकूळ दूध संघाचे संचालक शशिकांत पाटील यांचेमार्फत स्वीकृत संचालक म्हणून जीवन पाटील यांचे नाव कळविले, त्यानुसार आज संचालक मंडळाच्या बैठकीत जीवन पाटील यांची स्वीकृत संचालकपदी निवड करत नेतेमंडळींनी दिलेला शब्द पाळला असल्याची चर्चा होती.
निवड सभेस उपाध्यक्ष मनोज फराकटे, सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, यांच्यासह सर्व खाते प्रमुख व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.निवडीनंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यासह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.
*********
मी यापूर्वी संचालक मंडळात काम केले आहे.आमचे नेते माजी मंत्री सतेज पाटील यांनी पुन्हा संचालक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.अध्यक्ष के.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार राज्यात उत्कृष्ट चालला असून त्याला साथ देत पदाला साजेसे काम करुन निवड सार्थ करुन दाखवू असे मत नूतन संचालक जीवन पाटील यांनी व्यक्त केले.
