जिल्हाताज्या घडामोडी
मुरगुडात नगरपालिकेच्या ‘अरी वर्क’ प्रशिक्षणाला महिलांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

मुरगुडात नगरपालिकेच्या ‘अरी वर्क’ प्रशिक्षणाला महिलांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

सिंहवाणी ब्युरो / मुरगूड
मुरगूड नगरपरिषद मुरगूड च्या वतीने आयोजित ‘अरी वर्क’
प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी प्रशिक्षणार्थी महिलांसमवेत तज्ञ प्रशिक्षिका विदुला देवेकर मुरगूड नगरपरिषद मुरगूड. महिला व बालकल्याण विभाग व दिनदयाळ आजीविका अभियान मार्फत शहरातील महिलांसाठी १५ दिवसाचे मोफत आरी वर्क प्रशिक्षण देण्यात आले. सलग १५ दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत झालेल्या शहरातील दोनशे महिलांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला.
तज्ञ प्रशिक्षिका विदुला शरद देवेकर यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना आरी वर्कचे प्रकार व अन्य सविस्तर माहिती दिली. स्वागत रेश्मा चौगुले, प्रास्ताविक सुरेखा वडर तर सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले. अंजली हजारे, मनाली शिंदे, स्नेहल आबिटकर यांनी मनोगते मांडली तृप्ती पाटील यांनी आभार मानले.