जिल्हाताज्या घडामोडी
राष्ट्रसेवा दलाच्या पाचशे विद्यार्थ्यांनी घेतली गारगोटी स्वातंत्र्यलढ्याची माहिती

राष्ट्रसेवा दलाच्या पाचशे विद्यार्थ्यांनी घेतली गारगोटी स्वातंत्र्यलढ्याची माहिती
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड गडहिंग्लज कोल्हापूर इचलकरंजी येथून आलेल्या सुमारे पाचशे मुलांनी क्रांतीज्योतीला अभिवादन केले व गारगोटीचा स्वातंत्र्यलढा व हुतात्म्यांनी केलेले बलिदानाची माहिती घेतली. ग्रामीण भागातील हा लढा अनेक वर्षे अज्ञातवासातच राहिला याबद्दल श्री नदाफ यांनी यावेळी खंत व्यक्त केली. या इतिहासाला राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. गारगोटी येथील सम्राट मोरे मच्छिंद्र मुगडे सचिन भांदिगरे आदींनी या सर्व मुलांना अल्पोपराचे वाटप केले. त्यानंतर मुले भुदरगड मधील विविध पर्यटन स्थळे बघण्यासाठी रवाना झाली.
