तासगावात पत्रकार दापत्यांची कार्य तत्परता व मुलाची सुटका

तासगावात पत्रकार दापत्यांची कार्य तत्परता व मुलाची सुटका
सिंहवाणी ब्युरो / तासगाव
खेळकर लहान मुले खेळत असताना, तेथेच वावरत असताना कधी काय करतील याचा नेम नसतो. तासगावात ही असाच एक प्रकार दोन वर्षीय छकुल्याने केला. साद या छकुल्याने खेळत असताना घरातील आतील कडी लावली आत एकटाच अडकून पडला. तर येथीलच गायकवाड दाम्पत्यांसह परिसरातील नागरिकांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आतील कडी निघून सादला सुखरूप बाहेर आला.तासगावं शहरातील नागराज गल्ली येथे समीर तांबोळी आपल्या कुटुंबियासह रहात आहेत कुटुंबात वडिल, पत्नी.व साद, सारा, ही दोन जुळी मुले यांचा समावेश आहे समीर हे तासगांव अर्बन को-ऑप बँकेत पिग्मी गोळा करतात तर त्यांच्या पत्नी जि प शाळेत शिक्षिका आहेत. त्यामुळे या पती पत्नीचा अधिकचा वेळ बाहेरच असतो त्यांचे स्वतःचे एक घर असून पुढील बाजूचे घर त्यांनी भाड्याने घेतले आहे या दोन्ही घरात सर्वांचा वावर असतो.
दिवसभर घरी वडिल व मुले सांभाळण्यासाठी असणाऱ्या आजी असतात साद व सारा या मुलांच्याकडे यांच्यासह गल्लीतील सर्वांचे आवर्जुन लक्ष असते. या मुलांनी ही तसे प्रेम देऊन सर्वांना आपलेस केले आहे. सोमवारी दुपारी ४ च्या दरम्यान साद व सारा घरासमोरच खेळत होते. सारा कडे आजी गेल्या त्याच दरम्यान साद भाड्याने घेतलेल्या घरात गेला आणि कोणास काही कळायच्या आत दरवाजाची कडी आतून लावून घेतली.
शोधा शोध करीत असतानाच साद घरात व आतून कडी असेच चित्र पाहवयास मिळाले. हे समजताच परिसरातील महिलांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी कड़ी काडून साद ला बाहेर कसे काढायचे असा प्रश्न सर्वांसमोर उभा होता. दरम्यान तेथीलच चंद्रकांत जाधव, मोहन खंडागळे, मंथन खंडागळे, तसेच पत्रकार सुनिल गायकवाड यांनी ही तेथे धाव घेतली. सर्वांनीच बाहेरील बाजूने कडी काढण्याचे प्रयत्न सुरू केले पण कडी काढणे मुश्किल होत होते. दरम्यान पाठीमागील बाजूने कोणाला तरी पाठवून आतील कडी काढण्याचे ही प्रयत्न सुरू झाले.
गायकवाड दाम्पत्याचे यशस्वी प्रयत्न…
दरम्यान पत्रकार सुनिल गायकवाड यांनी आपल्या पत्नी समवेत प्रयत्न सुरू केले पुढील बाजूच्या कट्ट्यावर असलेल्या खिडकीत ते उभे राहिले व बाजूच्या खिडकीत त्यांच्या पत्नीना उभे राहण्यास सांगितले. त्या तेथून कडी कुठे आहे हे सांगत होत्या तर खिडकीतून लाकडी पट्टीने कड़ी काढण्याचा प्रयत्न ते करीत होते. काही वेळाच्या प्रयत्नानंतर समोरून योग्य दिशा मिळताच लाकडी पट्टीने कड़ी निघाली आणि सुमारे अर्ध्या तासाच्या सर्वांच्या यशस्वी प्रयत्नानंतर साद सुखरूप बाहेर आला.
फक्त मोठे झालेवरच बहिण भावांचे प्रेम असते असे नाही बच्चे कंपनीत ही बंधू प्रेम असते हे यावेळी दिसून आले. आपला मोठा भाऊ साद वर साराचे खूप प्रेम घटना घडली त्यावेळी तेथे लोक जमा होत असताना, ओ काका देखो तो…. अशी भावनिक हाक आपल्या साद साठी तिने दिली. तर तो दरवाजातून बाहेर येई पर्यंत तिची झालेली घालमेल, तळमळ हृदय हेलावणारी होती. साद बाहेर येताच तिने ही स्मित हास्य करीत सुटकेचा निःश्वास टाकला.
ही घटना घडली तेव्हा तांबोळी दाम्पत्य घरी नव्हते. सायंकाळी ५ च्या दरम्यान ते घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला आणि दोघेही अवाक् होऊन थक्क झाले.तर हा प्रकार ऐकल्यावर कळायचेच बंद झाले. असे स्पष्ट करून मी असते तर मला काय सुचलेच नसते, हादरूनच गेले असते अशी प्रतिक्रिया साद च्या मम्मीने व्यक्त केली व संपूर्ण गल्लीचे लक्ष दोन्ही मुलांच्यावर लक्ष असते असे ही बोलून दाखवले.तर या प्रकारावरून अन्य पालकांनी ही घरात लहान मुलांच्या हाताला येणाऱ्या कडी बाबत योग्यती दक्षता घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे.