जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
प्रभारी प्राचार्या कडून महिला शिक्षक , कर्मचारी यांना अपमानास्पद वागणूक; न्याय मागण्यासाठी शिक्षण संस्था चालकांना साकडे!

प्रभारी प्राचार्या कडून महिला शिक्षक , कर्मचारी यांना अपमानास्पद वागणूक;
न्याय मागण्यासाठी शिक्षण संस्था चालकांना साकडे!
सिंहवाणी ब्युरो / चदगड
गडहिंग्लज उपविभागातील दक्षिण दिशेला असलेल्या नावाजलेल्या एका महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य यांनी त्याच कॉलेजमध्ये गेली २५ वर्षे प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे शिकविणाऱ्या डॉ. प्राध्यापिकेचा पाठमोरा फोटो काढून तो आपल्याच स्टाफ मधील तसेच संबंधीत ग्रुपवर व्हायरल केल्याने त्या प्राचार्यांच्या विरोधात डॉ . प्राध्यापिका यांनी लेखी तक्रार शिक्षण संस्था आणि विद्यापीठा कडे दाखल केली असल्याचे समजते. प्रभारी प्राचार्यांच्या या गैरकृत्याची शिक्षणक्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रभारी प्राचार्यावर कारवाई करणार …? त्यांना पाठीशी घालणार ?याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ज्या महिला प्राध्यापिकेस त्रास दिला जात आहे त्या प्राध्यापिका महाविद्यालय स्तरावरील महिला अन्याय निवारण समितीच्या प्रमुख आहेत. अशा प्रमुख महिला प्राध्यापिकेस न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे अशी चर्चा चंदगड पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत.
चंदगड तालुक्यातील सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले.आणि गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण मिळावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन डाव्या विचार सरणीच्या माणसांनी शाळा, कॉलेज काढून त्या चांगल्या प्रकारे चालविल्या. मात्र अलीकडच्या काळात त्या शिक्षण संस्थेत गल्लीच्छ राजकारणामुळे वादाचे प्रसंग निर्माण झाले. हा वाद इतका टोकाला गेला की तो न्यायालयात गेला आहे. दरम्यान त्या शिक्षण संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी याबाबत यांनी त्या प्रभारी प्राचार्य गैरकृत्यांना पायबंद घालावा आणि याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
रात्री, अपरात्री व्हॉटसउप द्वारे कर्मचारी, शिक्षक यांना मेसेज करून त्रास दिला जात आहे याकडे निवेदनातून लक्ष वेधले आहे.