ताज्या घडामोडी

गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात; व्हिलेज फौंडेशनतर्फे देऊळवाडी शाळेत शालेय साहित्य वाटप

गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात; व्हिलेज फौंडेशनतर्फे देऊळवाडी शाळेत शालेय साहित्य वाटप

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
सेवाभावी संस्थांनी सामाजिक जबाबदारी म्हणून पुढाकार घेतल्यास ग्रामीण भागातील शिक्षण अधिक सक्षम होईल असे प्रतिपादन भुदरगड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे यांनी केले. ते व्हिलेज फौंडेशनच्या वतीने देऊळवाडी येथील प्राथमिक शाळेत आयोजित शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनिता पाटील होत्या.
गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे पुढे बोलताना म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगतीसाठी अशी मदत अत्यंत महत्त्वाची ठरते.
पत्रकार रविराज पाटील म्हणाले व्हिलेज फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल. यावेळी व्हिलेज फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या, कंपास आदी शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
व्हिलेज फौंडेशनचे अध्यक्ष सागर शिंदे यांनी प्रास्ताविकात व्हिलेज फौंडेशनच्या कार्याची माहिती दिली. यावेळी दैनिक सकाळचे मुंबई वितरण व्यवस्थापक दिनकर कोकीतकर‌, केंद्रप्रमुख विठ्ठल मगदुम उपसरपंच कविता सावर्डेकर, सदस्य सुभाष पाटील, सुनिता वसंत पाटील, संभाजी कांबळे, संगीता गणपती कांबळे, शिवाजी गुरव, बाबुराव पाटील, शाळा समिती अध्यक्ष सागर पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन रमेश नांदोलकर यांनी केले. आभार मुख्याध्यापिका सविता हजारे यांनी मानले.

फोटो: देऊळ वाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे, सरपंच सुनिता पाटील, सागर शिंदे आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button