आ. रोहित आर पाटील यांनी विविध कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट, सर्व मागण्या मंजूर करतो : गडकरी

आ. रोहित आर पाटील यांनी विविध कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट,
सर्व मागण्या मंजूर करतो : गडकरी
सिंहवाणी ब्युरो / तासगाव
आज केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची भेट तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित आर पाटील यांनी घेत मतदारसंघातील विविध मागण्यांबाबत विनंती केली आहे,
मागणीचे निवेदन रोहित पाटील यांनी आज दिले, निवेदनामध्ये म्हटलं आहे की
१)फलटण-दहिवडी-मायणी-वटा रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करत त्वरित काम पूर्ण व्हावे आणि विटा – तासगाव – म्हैसाळ या रस्त्याचा DPR चालू असून लवकर निविदा काढून काम व्हावे आणि होणारे अपघात व गैरसोय न व्हावी ही विनंती केली.त्याचबरोबर या रस्त्यावर असणाऱ्या तासगाव बायपासची मार्गिका बदलावी या मागणीचा पाठपुरावा केला.
२)सांगली सोलापूर महामार्गावरील शिरढोण या गावासाठी प्रस्तावीत असलेल्या नव्या पुलाचे निविदा प्रक्रिया तत्काळ पूर्ण करत नागरिकांची गैरसोय न व्हावी,
३)पुणे बेंगलोर ग्रीनफिल्ड महामार्गावरून प्रस्तावित एम.आय.डी.सी मणेराजुरी ता. तासगाव
NH166E हा महामार्ग जोडणेकरिता मार्गिका मिळावी
४) सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळज वायफळे धोंडेवाडी शेंडगेवाडी खानापूर बलवडी मेंगाणवाडी रस्ता प्रजिमा -७९ कि.मी.०/६०० सावळज गावाजवळ अग्रणी नदीवर पुलाचे बांधकाम व्हावे.
2) सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळज अंजनी गव्हाण मणेराजुरी कुमठे फाटा रस्ता प्रजिमा क्र.४० कि.मी.६/९०० गव्हाण गावातील अग्रणी नदीवर पुलाचे बांधकाम व्हावे, अशा मागण्या आहेत,
तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व मागण्या तसेच केंद्र व राज्य सरकारकडून निधीतून कामे करतो असे सांगितले, तसेच दिवंगत आर आर आबा पाटील यांच्या आठवणीही नितीन गडकरी यांनी रोहित पाटील यांना सांगितल्या.
