जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*महसूल विभागांतर्गत लोकोपयोगी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले अभिनंदन..*

*महसूल विभागांतर्गत लोकोपयोगी निर्णय महसूल मंत्री

चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले अभिनंदन..*

सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे काम सुलभ होण्यासाठी आपल्या महसुल खात्यामध्ये विविध क्रांतीकारी निर्णय घेतल्या बद्दल महसुलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे, कोल्हापूर जिल्हा भाजपाच्या वतीने अभिनंदन केले .
भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर यांचे हस्ते करवीर निवासिनी श्री आंबाबाई ची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन नामदार बावनकुळे यांचे अभिनंदन करण्यात आले .
महसुल विभागा कडून नागरीकांना अनेक दाखल्यांची आवश्यकता असते. त्यासाठी वारंवार तहसिल कार्यालय येथे जावे लागते . पुर्वी शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी स्टॅप ड्यूटी भरावी लागत होती. ती बंद करण्यात आली .
शालेय विद्यार्थ्यांना विना स्टॅप दाखले, कौटुंबीक वाटणी पत्रासाठी स्टॅप ड्युटीवर शिथिलता, तुकडे जोड तुकडे बंदी खरेदी कायदा रद्द करणे, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू देणे , असे अनेक निर्णय महसूल विभागामार्फत घेतल्याने नागरीकांना भोगावा लागणारा नाहक त्रास कमी झाला असल्यानेअसे नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button