ब्रेकिंग : भुदरगड तालुक्यातील फये व पाटगांव मौनी सागर धरणे १०० % भरले.

ब्रेकिंग
भुदरगड तालुक्यातील
फये व ‘पाटगांव मौनी सागर धरण १०० % भरले.
सिंहवाणी ब्युरो: शैलेंद्र उळेगड्डी, पाटगाव
भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेले चार दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भुदरगड, कागल सह कर्नाटक सिमवासियांना वरदान ठरलेले पाटगांव मध्यम प्रकल्प मौनी सागर जलाशय पुर्ण क्षमतेने भरला असून धरणामध्ये शंभर टक्के पाणी साठा झाला आहे. धरणाच्या सांडव्यातून 55.59 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग होत आहे.तसेच फये धरण देखील भरले असून सांडव्यावरून तूरळक प्रमाणत विसर्ग सुरु आहे.पावसाचा जोर असाच राहिल्यास धरणाच्या सांडव्यातून विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे,त्यामुळे पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.तालुक्यातील सर्व धरणे पुर्ण क्षमतेने भरल्याने वर्षभराचा पिण्याचा व शेतीसाठी च्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
गतवर्षी पाटगाव धरण ३०जुलै भरले होते.पाटगाव परिसरात सतत कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असल्याने प्रशासनाने खबरदारी घेऊन धरणातुन अगोदरच विसर्ग चालु ठेवला होता त्यामुळे धरण भरण्यास थोडासा उशीर लागला. गेले दोन दिवस धरण परिसरात संततधार पाऊस पडत असल्याने मौनी सागर जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.धरणात सुमारे ३.७५ टि. एम.सी. पाणीसाठा झाला आहे.जुन पासुन धरण परिसरात आज अखेर सुमारे ३९९७ मि .मि.पावसाची नोंद झाली आहे.गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत ४९९१ इतका पाऊस झाला होता.गत वर्षी या परिसरात ८४९५मिलमीटर पावसाची नोंद झाली होती.गत वर्षी पेक्षा तब्बल १००० मिलिमिटर पाऊस कमी होऊन देखील धरण या वर्षी मे महिना अखेर ३५ % पाणीसाठा शिल्लक असल्या मुळे दरवर्षी च्या तुलनेत लवकर भरले आहे.
गेल्या चोवीस तासात पाटगांव परिसरात १४० मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील कोंडूशी, वासनोली लघुप्रकल्प अगोदरच भरले आहेत सततच्या पावसाने वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे सततच्या पावसामुळे नदी काठच्या ऊस पिकासह भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
फोटो-
पाटगाव धरण” मौनी सागर जलाशय” पूर्ण क्षमतेने भरला