महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘ग्रंथमित्र ‘ पुरस्कार दत्ता देशपांडे यांना जाहीर..!

महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘ग्रंथमित्र ‘ पुरस्कार दत्ता देशपांडे यांना जाहीर..!
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज :
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा मानाचा आणि प्रतिष्ठेचा असणारा डॉ. एस.आर .रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार जरळी ता – गडहिंग्लज येथील ज्ञानदा वाचनालयाचे अध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार दत्ता देशपांडे यांना जाहीर झालाआहे.शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये 25,000/- असे स्वरुप आहे.
महाराष्ट्रातील जनतेचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे, यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, या ग्रंथालयांकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाकडून दरवर्षी उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.