तासगाव अर्बन उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित, तासगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

तासगाव अर्बन उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित, तासगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
सिंहवाणी ब्युरो / तासगावं :
दि महाराष्ट्र स्टेट को- ऑप. बँक्स एसोसिएशन लि., मुंबई यांचेकडून प्रतिवर्षी राज्यातील उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या नागरी सहकारी बैंकांना पुरस्काराने सन्मानित करणेत येते. दि तासगांव अर्बन को- ऑपरेटीव्ह बँकेच्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई बैंक्स असोसिएशन कडून बुधवार दि. २३/०७/२०२५ रोजी नरिमन पॉईंट, मुंबई येथे पुणे विभागातून रु. १०० कोटी ते रु. २५० कोटी पर्यंत ठेवी असलेल्या बैंक गटातून “पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बैंक” या पुरस्काराने सन्मानित करणेत आले. दि तासगांव अर्बन बँकेस हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री, मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, सारस्वत को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मा. श्री. गौतम ठाकूर साहेब यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री मा. ना. डॉ. श्री. पंकज भोयर साहेब यांच्या शुभहस्ते बँकेचे चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक यांना प्रदान करणेत आला.
दि तासगांव अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेस सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, सहकार आयुक्त अनिल कवडे, सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे, राज्य सहकारी बैंक्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्याहस्ते पुरस्काराचे सन्मानित करणेत आले होते. पुन्हा एकदा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पुणे विभागातील उत्कृष्ट नागरी सहकारी बैंक या पुरस्कानाने दि तासगांव अर्बन बँकेस सन्मानित करणेत आले.
बँकेचे अध्यक्ष श्री. महेश्वर हिंगमिरे, उपाध्यक्ष श्री. कुमार शेटे, बँकेचे संचालक श्री. सदाशिव शेटे, श्री. अरुण पाटील, श्री. विनय शेटे, श्री उदय वाटकर, श्री. रामशेठ शेटे, श्री. धोंडीराम सावंत, श्री. राजेंद्र माळी, श्री सौरभ हिंगमिरे, व्यवस्थापन मंडळ सदस्य श्री प्रदिप पवार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री श्रीकांत कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्विकारला. पुणे विभागातील एका दुष्काळी भागामध्ये कार्यरत असलेल्या तासगांव अर्बन बँकेने बैंकिंग व्यवसायामध्ये आपला एक ठसा उमटविला असून राज्यातील सर्व बँकांपुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे.
तासगांव अर्बन बँकेचे कार्यक्षेत्र सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्ह्यामध्ये विभागलेले असून सध्या बँकेच्या सर्व बारा शाखा ह्या सांगली व सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. बँकेची स्थिती अत्यंत मजबूत असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे सर्व मार्गदर्शक सुचनांनुसार बँकेमध्ये दैनंदीन कामकाज चालते.
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. ना. बाबासाहेब पाटील व सहकार राज्यमंत्री मा. ना. श्री. पंकज भोयर सो यांनी बँकेच्या कामकाजाबाबत कौतुक केले. रु. १०० कोटी ते २५० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या गटातून पुणे विभागामधून एकमेव तासगांव अर्थन बैंकेस या पुरस्काराने सन्मान करणेत आला.बँकेच्या ग्राहकांनी बँकेच्या सर्व संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी यांचेवर ठेवलेला विश्वास सार्थ ठरविलेला असून सहकारातील एक उत्कृष्ट व आदर्श बैंक म्हणून मिळालेला सन्मान सतत आठवणीत राहणार असलेची भावना बँकेचे अध्यक्ष महेश्वर हिंगमिरे, उपाध्यक्ष श्री. कुमार शेटे, बँकेचे संचालक श्री. सदाशिव शेटे, श्री. अरुण पाटील, श्री. विनय शेटे, श्री उदय वाटकर, श्री. रामशेठ शेटे, श्री. धोंडीराम सावंत, श्री. राजेंद्र माळी, श्री सौरम हिंगमिरे, व्यवस्थापन मंडळ सदस्य श्री प्रदिप पवार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री श्रीकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.