नागणवाडी ता. भुदरगड येथे ग्रामदैवत श्री नागनाथ मंदिर येथे नागपंचमी उत्सव मोठ्या थाटामाटात

नागणवाडी ता. भुदरगड येथे ग्रामदैवत श्री नागनाथ मंदिर येथे नागपंचमी उत्सव मोठ्या थाटामाटात
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
मौजे नागणवाडी ता. भुदरगड येथे ग्रामदैवत श्री नागनाथ मंदिर येथे नागपंचमी उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न. मुंबई स्थित महादेव तुकाराम साळोखे व श्री नागनाथ तरुण मंडळ मुंबई यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून नागपंचमी उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. पहाटे सहा वाजता कॅप्टन अजय साळोखे यांच्या हस्ते श्री नागनाथला अभिषेक घालण्यात आला तर आठ वाजता उपसरपंच दिलीप कदम यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा पार पडली. सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उपवास वाल्यांसाठी शाबू खिचडी व इतरांसाठी फूलावा व बुंदी लाडू असे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्यान गावातील वारकरी संप्रदायाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. श्री संत बाळूमामा मंदिर आदमापूर येथील सेवेकरी सहदेव साळोखे यांनी मंदिरात काढलेली आकर्षक फुलांची रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या कार्यक्रमासाठी हेळेवाडी चे बाळासो फराकटे यांनी मोफत स्पीकर लावला होता. या उत्सवासाठी गावच्या पंचक्रोशीतील पिंपळगाव ,पांगिरे ,हेळेवाडी, बामणे ,गडबिद्री व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मंदिराच्या आवारात महिलांनी गाण्याचा व झिम्मा फुगडी चा ठेका धरला होता. पहिल्याच वर्षी मोठ्या प्रमाणात नागपंचमी उत्सव पार पाडण्यासाठी माजी सरपंच तानाजी कदम ,माजी सरपंच अशोक साळोखे, पोलीस पाटील सुजाता साळोखे, पत्रकार सहदेव साळोखे ,महादेव साळोखे ,शहाजी पाटील कोल्हापूर ,नारायण शिंदे आना नगरसेवक मुंबई ,अशोक मगदूम ,दत्तात्रय पालकर, साईदास साळोखे ,राहुल कदम ,सातापा परीट, प्रदीप कदम ,शांताराम कदम ,अविनाश साळोखे ,मोहन साळवी ,आनंदा साळोखे ,तानाजी महाराज ,संभाजी गुरव, अशोक कांबळे ,मेजर पालकर ,पांडू सुतार ,बाजीराव साळवी ,बाळासो सुतार आदींनी खारीचा वाटा उचलून उत्सव पार पाडला.