राजेंद्र शेलार आणि दिगंबर पाटील यांचा सिंबायोसिस पुणे कडून Hall of Fame पुरस्काराने गौरव*

*राजेंद्र शेलार आणि दिगंबर पाटील यांचा सिंबायोसिस पुणे कडून Hall of Fame पुरस्काराने गौरव*
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज :
सिंबायोसिस सोसायटी पुणे येथे Hall of Fame पुरस्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा अतिशय मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गडहिंग्लज तालुक्यातील सिंबायोसिस स्कूल हरळी बुद्रुक येथील सहाय्यक शिक्षक राजेंद्र शेलार यांना “Hall of Fame Award – Excellence in Teaching तर “लिपिक दिगंबर पाटील यांना “Hall of Fame Award – Recognition of Loyalty”, या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
हा क्षण संपूर्ण सिंबायोसिस परिवार व सिंबायोसिस स्कूल, हरळी बु. साठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा ठरला. दिगंबर पाटील आणि शेलार सर यांचे सिंबायोसिस परिवार व सर्व विद्यार्थ्यांतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
या गौरवप्रसंगी डॉ. शां ब.मुजुमदार, संजीवनी मुजुमदार आणि प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांची प्रेरणा व आशीर्वाद लाभले. जे. आर. पाठारे,डॉ. गार्गी मित्रा, रजिस्ट्रार मिलिंद चौधरी , सुनील जैन, माधव कोथंबीरे , रमेश हंडे , वामन पुराणिक दत्ता देशपांडे,सौ.रश्मी गोखले विक्रांत गुरव, संभाजी कार्वेकर श्रीमती वहिदा मुल्ला, मुख्याध्यापिका कविता कागिनकर यांचे मार्गदर्शन लाभले.