संस्कारांचे आणि मूल्य शिक्षणाचे धडे देण्यास शैक्षणिक संस्थानी पुढाकार घ्यावा: जावेद मुशाफिरी श्री हरी काका मठात यशवंत गुणवंत सत्कार सोहळा

संस्कारांचे आणि मूल्य शिक्षणाचे धडे देण्यास शैक्षणिक संस्थानी पुढाकार घ्यावा: जावेद मुशाफिरी
श्री हरी काका मठात यशवंत गुणवंत सत्कार सोहळा
सिंहवाणी ब्युरो / हत्तरगी :
आज युवकांच्यामध्ये व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढत आहे. महापुरुषांच्या जयंती उत्सव यासह गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीत डॉलबिच्या आवाजात बेधुंदपणे अश्लील नृत्याने सण उत्सव यांचे पावित्र्य नष्ट होत आहे. युवकांना त्यापासून रोखण्यासाठी संस्कारांचे धडे देण्यासाठी मठ , मंदिरे, यांच्यासह शैक्षणिक संस्था यांनी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन यमकनमरडी पोलिस ठाण्याचे मंडळ पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी यशवंत गुणवंत गुणगौरव सोहळ्यात केले.
श्री हरीकाका गोसावी भागवत मठाचे उत्तराधिकारी डॉ. आनंद गोसावी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिडकल डॅम येथील लुरडू स्वामी यांची उपस्थिती होती.
यावेळी कर्नाटक राज्य शालांत परीक्षेत 95 टक्के गुण मिळविलेल्या साक्षी सुरेश नेर्ले, सामाजिक कार्यकर्ते रविन्द्र जीनराळे, पुनीत राजकुमार कर्नाटक राज्य रत्न पुरस्कार प्राप्त सी पी आय जावेद मुशाफिरी यांचा सत्कार डॉ. आनंद गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध परीक्षा आणि यशवंत गुणवंत यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी मुशाफिरी म्हणाले, यात्रा कालावधीत जनावरांच्या शर्यतीचे आयोजन करून जनावरांना ईर्षेने मारझोड केली जाते. हे दुर्देवी आहे. यावेळी डॉ. आनंद गोसावी म्हणाले आजची युवा पिढी सोशल मीडियाच्या जगात भरकटत चालली आहे. विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच मूल्य शिक्षण, आणि बालपणी योग्य पद्धतीने संस्कार घडविण्यासाठी आई, वडील, शिक्षक यांनी प्रयत्न केले पाहिजेत.
यावेळी प्राचार्य किरण चौगुले, नम्रता देसाई ,सुरेश नेर्ले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागतगीत गोपाळ चपणे यांनी म्हंटले. प्रास्ताविक डॉ. प्रा. सुनील देसाई यांनी केले . आभार करनाची यांनी मानले. सूत्रसंचालन सिद्धाप्पा तबरी यांनी केले.