तासगाव येथील वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात सरपंच,उपसरपंच यांच्यासाठी ३ दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा

तासगाव येथील वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात
सरपंच,उपसरपंच यांच्यासाठी ३ दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा
सिंहवाणी ब्युरो / तासगाव
“ग्रामपंचायत कारभार करताना ग्रामपंचायत अधिनियम, आणि कामकाजाची माहिती हवी असते. सरपंच,उपसरपंच यांना अधिकार, कर्तव्य, जबाबदारी, कामे याबद्दल आवश्यक अधिक माहिती होण्यासाठी मंगळवार दि.५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.पंचायत समिती तासगाव व महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग यांच्या वतीने या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणातून अधिक सक्षम होऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तम योगदान देण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असून तालुक्यातील सरपंच,उपसरपंचांनी प्रशिक्षणासाठी पुर्ण वेळ उपस्थित रहावे” असे आवाहन गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी केले आहे. पुणे विभागीय अप्पर आयुक्त कार्यालयाच्या सुचनेनुसार सांगली जिल्हा परिषद आणि ग्रामविकास विभाग अधिनिस्त रयत शिक्षण संस्थेचे वर्ये (सातारा) येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्राकडून तासगाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांच्यासाठी दि.५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत “ओळख ग्रामपंचायत कामकाजाची” याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात ग्रामपंचायत अधिनियमातील महत्त्वाची कलमे, मासिक सभा, ग्रामसभा,लेखा संहिता, अधिकार कर्तव्य,जबाबदारी, कामे,कर आकारणी आणि वसुली, नमुने १ ते ३३, ग्राम समित्या, शासकीय उपक्रम, ऑनलाईन कामकाज याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
या प्रशिक्षण कार्यशाळेत तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांनी प्रशिक्षणासाठी पुर्ण उपस्थित राहून अधिक सक्षम व्हावे,” असे आवाहन गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी केले आहे
या गावांसाठी होणार प्रशिक्षण
तालुक्यातील अंजनी, आरवडे, बलगवडे, बेंद्री, भैरववाडी, खुजगाव, कुमठे, लिंब, नागाव (नि), पानमळेवाडी, सावर्डे, उपळावी, वायफळे, बलगवडे, चिंचणी, कचरेवाडी, मणेराजुरी, मतकुणकी, नागेवाडी, नेहरूनगर, निमणी, पुणदी (ता.), शिरगांव (क), वंजारवाडी, वासुंबे, योगेवाडी, बिरणवाडी, चिखलगोटण.