गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी बनविलेल्या ७००० राख्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या सहा कॅम्पवर पाठवल्या

गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी बनविलेल्या ७००० राख्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या सहा कॅम्पवर पाठवल्या
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी बनविलेल्या ७००० राख्या प्रतीवर्षीप्रमाणे सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पाठविल्या असून राख्यांचे बॉक्स शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. संचिता नामदेव चव्हाण हिच्या हस्ते
माजी सैनिक प्रवीण शामराव वारके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. गतवर्षी भारतीय आर्मी कडून शाळेच्या या उपक्रमाची दखल घेऊन शाळेस भेटवस्तु पाठविल्या होत्या.
गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थिनींसाठी राख्या निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग घेऊन सुमारे ७००० राख्या तयार केल्या होत्या. दरवर्षी शाळेच्या वतीने सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी सहा कॅम्पवर राख्या पाठवल्या जातात. यावर्षीही ७००० राख्या पाठवण्यात आल्या आहेत.
यावेळी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, विभागप्रमुख श्रीमती आर.आर.बहादुरे, प्रा.सौ.रोहिणी निकम, प्रा.सौ.स्नेहा साळोखे, सौ.एल.आर.पाळेकर, सौ.राजवी साठे, श्रावणी मोरे, सौ.मंगल कांबळे यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होते.