अचलेर तांड्यावरील विद्यार्थ्याला आका च्या गँग ने केली मारहाण: मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अचलेर तांड्यावरील विद्यार्थ्याला आका च्या गँग ने केली मारहाण:
मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सिंहवाणी ब्युरो / महेश गायकवाड l सोलापूर
विद्या विकास हायस्कूल मध्ये इयत्ता दहावी च्या वर्गात शिकणा-या कुमार गणेश राजू पवार या विद्यार्थ्याला गटबाजी मधून जबर करून मारहाण करण्यात आली असून अचलेर तांड्यातील ‘अक्का’ च्या गँग ने ही मारहाण केली असल्याचे कळते त्यामुळे अचलेर तांड्यावर असलेल्या अक्का चा शोध घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.
अचलेर तांडा येथील राजू पवार या विद्यार्थ्याला
विद्या विकास हायस्कूल, च्या आवारात गंभीर मारहाण करण्यात आली आहे. अचलेर तांडा येथील इयत्ता १० वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांना तांड्यातील काही मुलांनी गटबाजी करून बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अचलेर येथील विद्या विकास शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी आणि शिक्षकांनी अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी येऊ उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.
या मारहाणीमागे कोणाचा हात आहे, कोण “अक्का” आहे, याचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मुरूम पोलीस प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गांभीर्याने घेणे आवश्यक असून यामागील सूत्रधारांची ओळख पटवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
या घटनेमुळे अचलेर व पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शाळकरी मुलांच्या मानसिकतेवर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व पालक वर्ग करत आहेत.
अचलेर व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढल्यामुळे तांड्यावर असलेल्या अका ची चलती सुरू असल्याची चर्चा गावपातळीवर दबक्या आवाजात सुरू आहे.
राजू पवार या विद्यार्थ्याला त्याचे हातपाय तोडण्याची आणि त्याचा खून करण्याची धमकी देखील आका च्या गँग ने दिली असल्याचे कळते.
अचलेर गावात आका कसा तयार झाला हे ग्रामस्थांना माहिती आहे आका ने गावात शांत आलेले वातावरण खराब करू नये
अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत