निर्माण फेलोशिप’ साठी नचिकेत भद्रापूर यांची निवड; गडचिरोली जिल्ह्य़ात करणार काम!

‘निर्माण फेलोशिप’ साठी नचिकेत भद्रापूर यांची निवड; गडचिरोली जिल्ह्य़ात करणार काम!
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज, /
समाज परिवर्तनासाठी सक्रिय असलेल्या युवकांचे संघटन नचिकेत भद्रापूर बांधणाऱ्या राज्यस्तरीय”निर्माण फेलोशिप” कार्यक्रमासाठी येथील नचिकेत र्ग नरेंद्र भद्रापूर यांची निवड झाली आहे. राज्यभरातील निवडक उमेदवारांमध्ये भद्रापूर यांची निवड झाली आहे.
“निर्माण” ही फेलोशिप डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेतून सुरू झाली आहे. ज्यामध्ये निवडक युवकांना सामाजिक प्रश्नांवर काम करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. समाजातील खोलवरच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यावर शाश्वत उपाय शोधणे, ही या फेलोशिपची मुख्य भूमिका आहे.भद्रापूर हे वयाच्या ११ व्या वर्षीपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी “होप फाउंडेशन” या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून गेली १३ वर्षे निराधार, एचआयव्ही बाधित अनाथ मुले, गरजू विद्यार्थीसह आरोग्य, स्वच्छता, कृषी व पर्यावरण आदी क्षेत्रात ते काम करीत आहेत. या फेलोशिपद्वारे गडचिरोली जिल्ह्यात प्रत्यक्ष सामाजिक वास्तव अनुभवण्यासह ते तेथील जनतेसोबत राहून त्यांच्या अडचणी समजून घेत काम करणार आहेत. ही फेलोशिप केवळ संधी नसून, समाजकार्याच्या प्रवासाचा एक नवा टप्पा आहे. गावोगावी व घरोघरी काम करणाऱ्या नायकांकडून शिकण्याची ही संधी असून त्याचा वापर गडहिंग्लजसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.