शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुखे यांनी शिक्षणातून सुसंस्कारी समाज घडविला – प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे* *वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात बापूजी साळुंखे पुण्यस्मरण

शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुखे यांनी शिक्षणातून सुसंस्कारी समाज घडविला –
प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे*
*वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात बापूजी साळुंखे पुण्यस्मरण सोहळा *
सिंहवाणी ब्युरो / तासगाव
‘ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार ‘ हे ब्रीद उराशी बाळगून शिक्षणापासून वंचित असलेल्यांच्या दारापाशी ज्ञानाची गंगा घेवन जाणारे डॉ.बापूजी साळुंखे हे महामानव होते. ग्रामीण भागात संस्कारकेंद्रे स्थापन करून शिक्षणातून सुसंस्कारी समाज घडविण्याचे कार्य बापूजींनी केले असे उद्गार महाविघालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे बापूजी साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले सत्य ,शील प्रमाणीपणा,त्याग,सेवा,पिळवणूक प्रवृत्तीस आळा यांची शिकवण बापूजींनी शिक्षणाव्दारे समाजाला दिली.सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्याचे महत्त्वाचे कार्य डॉ.बापूजींनी केले.त्यांचा हा वसा आणि वारसा प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पुढे चालवायचा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम कमिटीप्रमुख डॉ.साईनाथ घोगरे यांनी केले तर आभार डॉ.शहाजी पाटील यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमाला उपप्राचार्य जे.ए.यादव ,नॅक समन्वयक डॉ.जीवन घोडके, ज्युनिअर विभाग प्रमुख एस.डी.पाटील,विज्ञान विभाग प्रमुख पी.डी.पाटील, महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख , प्राध्यापक , प्रशासकीय सेवक वर्ग व विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते