सरपंच व सदस्यांनी गावचा विश्वस्त म्हणून काम करावे – गटविकास अधिकारी अविनाश पाटील : वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात सरपंच व सदस्यांसाठी कार्यशाळा संपन्न

सरपंच व सदस्यांनी गावचा विश्वस्त म्हणून काम करावे – गटविकास अधिकारी अविनाश पाटील :
सिंहवाणी ब्युरो / तासगाव :
गावागावांतील सरपंच व सदस्यांनी गावचा विश्वस्त म्हणून काम करावे,गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गावातील वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन पंचायत समिती तासगावचे गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी केले.ते तासगाव येथील पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग,जिल्हा परिषद,पंचायत समिती व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र वर्ये-सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सरपंच व सदस्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी अविनाश पाटील म्हणाले,तालुका विकासात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रत्येक गावचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे.यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका महत्वाची आहे.प्रत्येक सदस्यांनी आपापल्या वार्डातील समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे.आज ग्रामपंचायती बाबत अनेक नवीन बदल,कायदे करण्यात आले आहेत.आदर्श कारभार करण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे.शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम केले तर तालुका विकासात अग्रेसर राहील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.जे.ए.यादव होते.यावेळी ते म्हणाले,सरपंच हा गावच्या विकासाचा कणा आहे.महाविद्यालयात प्रशिक्षण घेवून जाणाऱ्या सरपंच व सदस्यांनी गावच्या विकासासाठी प्रयत्नशील रहावे.
यावेळी प्रदीप माने यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक डॉ.नितीन गायकवाड यांनी केले.किशोर मरे प्रशिक्षणार्थी सहाय्यक गट विकास अधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कामकाजाची कायदेशीर तरतूदी, मासिक सभा,कर आकारणी आणि वसुली, शासकीय योजना, रेकॉर्ड, लेखा संहिता,अंदाजपत्रक, सरपंच सदस्यांचे अधिकार, कर्तव्य,कायदे याबाबत ३ दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत गटविकास अधिकारी अविनाश पाटील,प्राचार्य विजय जाधव, विस्तार अधिकारी पोपट सुतार, जयसिंग पाटील,ग्रामपंचायत अधिकारी राहूल गुरव, प्रविण प्रशिक्षक विद्याधर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचा समारोप गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी डॉ.नरेंद्र कुलकर्णी होते.यावेळी दिपाली वाघमोडे,संध्या राजमाने,विद्यादेवी पाटील,व्ही.ए.पाटील, कबीर वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.आभार डॉ.विलास साळुंखे यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यशाळेस तालुक्यातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.नितीन गायकवाड,डॉ.विलास साळुंखे,प्रा. प्रविण देशमुख,विस्तार अधिकारी पोपट सुतार,जयसिंग पाटील यांनी प्रयत्न केले.