मृत्यूचा लाईव्ह VIDEO! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला बाहरे कुठेही मसाज करुन घेताना सावधान!

मृत्यूचा लाईव्ह VIDEO!
मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला
बाहरे कुठेही मसाज करुन घेताना सावधान!
विडिओ पहा
https://www.instagram.com/reel/DMxp-ZlyeO7/?igsh=MTBlaDZ2azVmNnY1
सिंहवाणी वेब टीम
: अनेक जण मस्त वाटतं, शरीर मोकळं होतं यासाठी मालिश करून घेतात. त्यासाठी सलूनमध्ये जाऊन पैसे खर्च करतात. कधी कधी तर खूप पैसे खर्च करून लोक फिजियोथेरपीही घेतात. मात्र, ते आपल्यासाठी कितपत योग्य आहे याचा विचार करीत नाहीत. तसेच अनेकांना सारखी मान मोडायची सवय असते. सलूनमध्ये दुसऱ्याच्या हातूनही ते मान मोडून घेतात. मानेच्या शिरा मोकळ्या करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनेक जण हे वारंवार करतात. अशाच एका महिलेला फिजिओथेरपिस्टकडून मानेच्या शिरा मोकळ्या करून घेणं चांगलाच महागात पडलंय. अवघ्या पाच सेकंदांत काही कळायच्या आतच या महिलेचा जागीच मृत्यू झालाय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला पलंगावर बसली आहे, आणि एक व्यक्ती महिलेच्या मानेला काहीतरी करताना दिसत आहे. सुरुवातीला ही महिला तिला रिलॅक्स वाटत असल्यासारखे हावभाव करीत आहे, हसत आहे. त्यानंतर अचानक ही माहिला मागे पडते, दोन वेळा तिचं शरीर थोडं हलतं आणि त्यानंतर ती श्वास सोडते. अवघ्या पाच सेकंदांचा मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चुकीच्या पद्धतीने मानेची नस दाबल्यानं या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ कुठल्या शहरातील घटनेचा आहे ते स्पष्ट झालेले नाही; पण सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
अशा स्थितीत तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की, डोकं दाबल्यानंतर ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो का? उत्तर आहे, होय. चुकीच्या ठिकाणी दाबल्याने मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो; ज्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो.