गडहिंग्लज उपविभागातील विद्यार्थ्यांना शिवराज बहुउद्देशीय विद्यापीठ उभारून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार ::प्रा किसनराव कुऱ्हाडे

गडहिंग्लज उपविभागातील विद्यार्थ्यांना शिवराज बहुउद्देशीय विद्यापीठ उभारून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार ::
प्रा किसनराव कुऱ्हाडे
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज :
वारणा, रयत पॅटर्न प्रमाणे गडहिंग्लज उपविभागातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवराज बहुउद्देशीय विद्यापीठाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुऱ्हाडे यांनी दिली.
प्रा.किसनराव कुराडे यांचा ८१ वा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. या वाढदिवसानिमित्त शिवराज विद्या संकुलामध्ये एन.सी.सी.व क्रिडा विभागाच्यावतीने मुत्नाळ येथून आणलेल्या ऑगस्ट क्रांती ज्योतीचे स्वागत करण्यात आले. बी.सी.ए.विभाग सेल्स प्रमोशन उपक्रमाचे उदघाटन, फार्मसी महाविद्यालयातर्फे वृक्षारोपण, शिवराज इंग्लिश मेडियम मार्फत रक्षाबंधन, प्रा.किसनराव कुराडे लिखित ‘पती पिडीत पत्नी, पत्नी पिडीत पती आणि परस्पर पीडितांच्या हत्या आणि आत्महत्या’ या पुस्तकाचे प्रकाशन आदी कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध क्षेत्रात बहुमोल योगदान दिलेल्या व्यक्तीमत्वांचा ‘शिवराज कृतज्ञता सन्मान २०२५, इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल नूल येथे शिवराज फौंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यातआले. माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर यांनी शिल्पकार सिद्धेश किरण कुंभार यांच्या कल्पकतेतून साकारलेले छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा अॅड.व्ही.एस. पाटील व अरुण शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी नचिकेत भद्रापूर व शिल्पकार सिद्धेश किरण कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.प्रा.किसनराव कुराडे यांचा सत्कार प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक संचालक बसवराज आजरी यांनी केले. या कार्यक्रमात ‘शिवराज कृतज्ञता सन्मान पुरस्कार २०२५’शाहीर सदानंद शिंदे, पत्रकार डॉ. प्रा. सुनील देसाई, प्राचार्य साताप्पा कांबळे, हनमंत साठे, रामकुमार सावंत, शारदा आजरी या मान्यवरांना देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सत्कारमूर्ती प्रा. कुराडे म्हणाले आपण समाजासाठी आपल्या परीने जे-जे योगदान देत आहोत याचे सार्थक झाल्याचे समाधान आपणास वाटत असल्याचे सांगून समाज हेच माझे कुटुंब आहे. या समाजासाठी जे-जे करता येईल त्यासाठी आपला प्रयत्न सुरु राहणार आहे. शिवराज विद्या संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आणि या समाजासाठी जे-जे करता येईल त्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. समाजाच्या कल्याणासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवराज हे बहुउद्देशीय विद्यापीठ व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रा.कुराडे यांच्या प्रयत्नांची प्रेरणा घेऊन त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही धडपडत आहोत. त्याच्या स्वप्नातील संकल्प पूर्ण करणे हेच आमचे ध्येय राहील .शिवराज विद्या संकुलामध्ये गडहिंग्लज उपविभागातील विद्यार्थ्यांच्यासाठी लॉ कॉलेज सुरु करण्यात येणार असल्याचे डॉ.अनिल कुराडे यांनी स्पष्टकेले.
यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, अॅड.व्ही.एस. पाटील, प्रा.रामकुमार सावंत, राजश्री आजरी आदींनी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमास शिवसेना उ बा ठाकरे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, दिलीप माने, गोड साखर कारखाना चेअरमन प्रकाश पत्ताडे, संस्थेचे उपाध्यक्ष के. जी. पाटील, अॅड.दिग्विजय कुराडे, के. व्ही. पेडणेकर, नंदनवाडे गुरुजी, श्रीरंग उर्फ पापा चौगुले, एम. के. सुतार, बाबासाहेब पाटील, इलीयस बारदेस्कर, प्रकाश तेलवेकर, अजित चौथे, इकबाल अत्तार, तमान्ना बोरगावे, गणपतराव डोंगरे, अॅड. बाळासाहेब पाटील, राजगोंडा पाटील, नागेश चौगुले, युवराज बरगे, प्रकाश माळी, अॅड.आप्पा जाधव, भास्करराव पाटील, गडहिंग्लज तालुका बार असोसिएशनचे पदाधिकारी, ऐनापुरचे सरपंच बाळासो देसाई, उपाध्यक्ष , प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्रा. पौर्णिमा कुऱ्हाडे, प्रा.विश्वजित कुराडे, अॅड.सतीश ईटी, राजशेखर येरटे, बाबुराव बसाण, फार्मसीचे प्राचार्य डॉ.राहुल जाधव, शिवराज इंग्लिश मेडीयमचे प्राचार्य ए.बी.पाटील, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, ग्रंथपाल संदीप कुराडे, रजिस्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर ,प्राध्यापक,,प्रशासकीयसेवक,विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.अशोक मोरमारे व डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले.