जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अभ्यास दौऱ्यातून ज्ञानाने समृद्ध होऊन परता जिल्हाधिकारी येडगे; ‘आत्मा’तर्फे बंगळूर व म्हैसूर सहलीला शेतकरी रवाना

आत्मा’तर्फे बंगळूर व म्हैसूर सहलीला शेतकरी रवाना

अभ्यास दौऱ्यातून ज्ञानाने समृद्ध होऊन परता
जिल्हाधिकारी येडगे;


आत्मा’तर्फे बंगळूर व म्हैसूर सहलीलकरी रवाना

सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर :
आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौऱ्यात सहभागी शेतकऱ्यांनी कृषिविषयक ज्ञानाने समृद्ध होऊन परतावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज येथे व्यक्त केली.
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून व कृषितंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) जिल्ह्यातील पीक स्पर्धेतील विजेत्या, प्रयोगशील शेतकरी बंगळूर व म्हैसूरमधील विविध शासकीय संशोधन केंद्रांत अभ्यास दौऱ्यासाठी आज रवाना झाले. त्यावेळी श्री. येडगे बोलत होते. शासकीय विश्रामगृह येथे श्री. येडगे यांनी हिरवा झेंडा दाखवून दौऱ्याचे उद्घाटन केले. पाच दिवसांचा अभ्यास दौरा आहे.
श्री. येडगे म्हणाले, “अभ्यास दौऱ्यात शेतकऱ्यांनी नवनवीन शेती प्रयोगाचे निरीक्षण करावे. शेतीविषयक जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करून त्याचा
फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करून द्यावा. प्रकल्पांचे निरीक्षण करताना नोंदी घ्याव्यात व तंत्रज्ञान समजून घ्यावे. ते जिल्ह्याचे ब्रँड अॅम्बेसिडर
म्हणून शेतकरी दौऱ्याकरिता जात असून, परराज्यातील शेती क्षेत्रातील नवनवीन प्रयोग त्यांना पाहता येतील.
विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट फॉर हॉर्टिकल्चर रिसर्च (आयआयएचआर) बंगळूर व म्हैसूरमधील सेंद्रियशेती संशोधन संस्थेला भेट देऊन तेथील ज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे, असे आवाहन केले. प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, कृषिभूषण पुरस्कारप्राप्त सर्जेराव पाटील, शरद देवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालींदर पांगरे, करवीरचे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, विशेष कार्य अधिकारी शरद मगर, संदेश भोईटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button