श्री शाहू कुमार भवन प्रशालेत रक्षाबंधन निमित्त विविध उपक्रम

श्री शाहू कुमार भवन प्रशालेत रक्षाबंधन निमित्त विविध उपक्रम
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
श्री शाहू कुमार भवन गारगोटी येथे रक्षाबंधन विविध उपक्रमांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला गेला 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन व ऑगस्ट क्रांती दिन एकाच दिवशी होते .पण दोन्हीही सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले 9 ऑगस्ट क्रांती दिन गारगोटी कचेरीवरील हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून साजरा करण्यात आला व हुतात्म्यांना एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी गार्ड ऑफ ऑनर दिला तसेच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून प्रशालेच्या विद्यार्थिनींनी 5000 राख्या तयार केल्या व भारताच्या विविध ठिकाणी सैन्यात सेवा बजावत असलेल्या जवानांना या राख्या पाठवण्यात आल्या त्याचबरोबर एनसीसी विभागाच्या वतीने वृद्धाश्रमास भेट देऊन त्या वृद्धांसोबत हा सण साजरा करण्यात आला . निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी झाडाला राखी बांधण्याचे काम विद्यार्थिनींनी केले प्रशालेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना राखी बांधून हा सण उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस बी शिंदे सौ. पी एम शिंदे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एन ए जाधव यांनी व सौ आर ए पलंगे यांनी आभार मानले