खुजगांव मधील राजकीय श्रेयवादातुन ग्रामीण मार्ग 27 चे अंदाजे सव्वा कोटी परत.

खुजगांव मधील राजकीय श्रेयवादातुन ग्रामीण मार्ग 27 चे अंदाजे सव्वा कोटी परत.
सिंहवाणी ब्युरो / तासगावं
खुजगांव तालुका तासगांव येथील खुजगांव ते फुटकाघाना रस्त्यास 2012/13 साली जोतिराम जाधव. माजिसैनिक यांनी तत्कालीन ख़ासदार व केंद्रीय मंत्री प्रतिकदादा पाटिल यांच्या मदतिने 5 किलोमीटर रस्त्यासाठी (PMSY) प्रधानमंत्री सडक योजनतून रू 2 कोटी 79 लाख मंजुर करुन आणले आसता राजकीय श्रेयवादातून माझ्या कोंबड्याने
उजडत नाही या हेतुने खुजगांव हद्दीतील 2 किलोमीटर रस्ता व अंदाजे सव्वा कोटी परत घालवल्या गेल्याने, सदर रस्त्याने ये जा करनाऱ्या खुजगांव व वाघापुरच्या अंगणवाडी ते हायस्कूलच्या लहान मुलांना शाळेस व शेतकरयांना चीखलातुन गावात दुध घालने चारा ने आन करावे लागत आहे.
हा रस्ता जुना आटपाडी ते मिरज कमी आनंतरचा म्हणुन ओळखला जातो व गेली 10/15 वर्ष झाले मागणी करुन ही रस्ता केला जात नाही पन शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही शेतकरयांची मागणी नसताना 6 पादरी 802 किलोमीटरसाठी 86 हाजार कोटी खर्च केला जात आहे जर तुम्ही गूगल सर्च केल्यास देशात 8 पादरी रस्त्या साठी प्रति किलोमीटर 45 ते 50 कोटी खर्च होतो तर इथे एक किलोमीटरसाठी रू 107 कोटी 23 लाख खर्च दाखवला जातोय याचा आर्थ राज्यात प्रति किलोमीटर 50 ते 60 कोटी भ्रस्टाचार दिसतोय.
जोतिराम जाधव यांनी ईशारा दिला आहे,
मागील 3 किलोमीटर रस्त्या प्रमाने हा रस्ता या यावर्षीचा पावसाळा संपल्या नंतर 20 जानेवारी 26 प्रयन्त पुर्ण न झालेस 25 जानेवारी 26 ला शाळेकरी मुले व शेतकरयांना बरोबर घेऊन खुजगांव ते फुटकाघाना रस्त्यावर हायस्कूल जवळ आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्या,आमदार, ख़ासदार, पंचायत समिती, जिल्हापरिषद व ग्रामीण मार्ग अधिकारी यांनी घ्यावी.