जिल्हाताज्या घडामोडी

शरद सहकारी सुतगिरणीच्या चेअरमनपदी श्री.बाबुराव देसाई तर व्हा.चेअरमनपदी श्री.अशोकराव फराकटे पहिल्या टप्यात १२५०० चात्यांचा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात येणार

शरद सहकारी सुतगिरणीच्या चेअरमनपदी श्री.बाबुराव देसाई तर व्हा.चेअरमनपदी श्री.अशोकराव फराकटे


पहिल्या टप्यात १२५०० चात्यांचा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात येणार


सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
शरद सहकारी सुतगिरणी, आकुर्डे ता.भुदरगड जि.कोल्हापूर या सहकारी सुतगिरणीच्या चेअरमनपदी श्री.बाबुराव देसाई (आण्णाजी) यांची तर व्हा.चेअरमनपदी श्री.अशोकराव फराकटे यांची निवड करण्यात आली. यावेळी ना प्रकाश आबिटकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी, सदस्य यांना शुभेच्छा दिल्या.

शरद सहकारी सूतगिरणी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत उभारण्याचा मानस असून पहिल्या टप्यात १२५०० चात्यांचा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या सूतगिरणीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी देण्याबरोबर अत्याधुनिक औद्योगिक प्रकल्पाचे तालुकावासीयांचे स्वप्न साकार होणार आहे.

यावेळी नुतन संचालक सुभाषराव चौगले, जयवंत चोरगे, संजय पाटील, यशवंत (बाबा) नांदेकर, धैयशील भोसले, अशोक फराकटे, शहाजी देसाई, सुभाष चौगले, अनंत पाटील, संजय पाटील, रंगराव मगदूम, अतुल पाटील, जयवंत चोरगे, रामचंद्र शिऊडकर, दादासो पाटील, उमाजी पाटील, सुनिल जठार, बाळकृष्ण भोपळे, महादेव खोत, उमेश तेली, वैशाली डवर, विजया देसाई यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नेते के.जी.नांदेकर, नंदकुमार सूर्यवंशी-सरकार, दत्ताजीराव उगले, कल्याणराव निकम, अरुणराव जाधव, जालंदर पाटील सर, अंकुश चव्हाण, सूर्याजीराव देसाई, निवासराव देसाई, शिवाजी ढेंगे, संदिप व्हरंडेकर, विजयराव बलुगडे, संग्रामसिंह सावंत, संजय पाटील, तानाजी चौगले, डॉ.सर्जेराव कवडे, अमित देसाई यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button