आमदार रोहित (दादा) आर. आर. पाटील यांची तासगांव अर्बन बँकेस सदिच्छा भेट, बँकेचे केले कौतुक

आमदार रोहित (दादा) आर. आर. पाटील यांची तासगांव अर्बन बँकेस सदिच्छा भेट,
बँकेचे केले कौतुक
सिंहवाणी ब्युरो / तासगाव
शुक्रवार दि. ०८/०८/२०२५ रोजी आमदार श्री. रोहित (दादा) आर. आर. पाटील यांनी तासगांव अर्बन बँकेस सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी बँकेचे संचालक श्री. विनय शेटे यांनी सुत्रसंचालन व प्रास्ताविक केले. बँकेचे चेअरमन श्री महेश्वर हिंगमिरे व व्हा. चेअरमन श्री कुमार शेटे यांच्या हस्ते आ. रोहित (दादा) पाटील यांचे स्वागत व सत्कार करणेत आला.
बँकेचे चेअरमन महेश्वर हिंगमिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बँकेच्या आजपर्यंतच्या प्रगतीची तसेच बँकेच्या आर्थिक स्थितीबाबतची माहिती दिली. बँकेचे व्हॉ. चेअरमन कुमार शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, बँकेच्या प्रगतीमध्ये सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांचा मोलाचा सहभाग आहे. बँकेच्या प्रगतीसाठी आपलेही सहकार्य रहावे असे सांगीतले.
यावेळी आ. रोहित (दादा) पाटील यांनी बँकेचा अहवाल व सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या प्रगतीची आकडेवारी पाहिली. बँकेच्या कामकाजाबाबत गौरव उद्गार व्यक्त करुन बँकेतील कामकाजाबाबत व प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई यांचेकडून बँकेच्या चांगल्या कामकाजाबाबत पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक (पुणे विभाग) पुरस्काराने सन्मानित करणेत आले त्याबद्दल सर्व संचालक व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले. बँकेकडून नेहमीच सामाजिक बांधीलकी जपण्यात आलेली आहे. विविध सामाजीक क्षेत्रास वेळोवेळी बँकेकडून आर्थिक सहाय्य करणेत आलेले आहे. आम्ही सुरु केलेल्या सैनिक कल्याण निधीस आपले बँकेकडून देणगी मिळणेबाबत आ. रोहित (दादा) यांनी संचालक मंडळास आवाहन केले. याची त्वरीत दखल घेवून संचालक मंडळाकडून सैनिक कल्याण निधीस सहाय्य म्हणून रु. ११०००/- चा चेक देणेत आला.
बँकेचे सभासद व राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष अॅड. श्री. गजानन खुजट यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बँकेचे चेअरमन महेश्वर हिंगमिरे, व्हा. चेअरमन श्री कुमार शेटे, संचालक अरुण पाटील, विनय शेटे, . अनिल कुत्ते, उदय वाटकर, धोंडीराम सावंत, रामशेठ शेटे, राजेंद्र माळी, श्री सौरभ हिंगमिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, असि. जन. मॅनेजर. नारायण सगरे, विनायक मेंडगुले, बँकेचे कर्मचारी तसेच माजी नगराध्यक्ष अमोल (नाना) शिंदे, तासगांव तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष विश्वास तात्या पाटील, माजी नगरसेवक बाळासाहेब सावंत, स्वप्नील जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यानंतर संचालक श्री विनय शेटे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.