ज्येष्ठ नागरिक आनंदा पाटील यांचे निधन, निमणी गावावर शोककळा

ज्येष्ठ नागरिक आनंदा पाटील यांचे निधन, निमणी गावावर शोककळा
सिंहवाणी ब्युरो / तासगावं
निमणी तालुका तासगाव येथील ज्येष्ठ नागरिक आनंदा कृष्णा उर्फ ए.के.काका पाटील यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.
त्यांनी निमणी विकास सोसायटीचे माजी प्रशासक, माजी व्हाईस चेअरमन, वसंत शिक्षण संस्थेचे माजी सचिव तसेच येळावी येथील बाबासाहेब पाटील सिमेंट वस्तू उत्पादक सहकारी संस्थेचे माजी चेअरमन व बाबासाहेब पाटील सहकारी पतसंस्थेचे संचालक अशा विविध पदांवर काम पाहिले होते.
आनंदा कृष्णा (ए.के काका) पाटील यांचे माजी आमदार स्व.बाबासाहेब पाटील तसेच वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन विजय आण्णा पाटील यांच्या परिवाराशी घनिष्ट संबंध होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
निमणी गावातील ते वयाने ज्येष्ठ ग्रामस्थ होते. ग्रामदैवत श्री हनुमान जयंती उत्सवात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा तसेच कुस्ती शौकीन असल्याने कुस्त्यांच्या फडांमध्ये त्यांचा सतत वावर असायचा.