क्राईमताज्या घडामोडी
गड बिद्री येथील युवकाची इंजूबाई कॉलनी गारगोटी येथे आत्महत्या

गड बिद्री येथील युवकाची इंजूबाई कॉलनी गारगोटी येथे आत्महत्या

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
येथील इंजूबाई कॉलनी गारगोटी (ता. भुदरगड) येथे 19 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. 12 ऑगस्ट) सायंकाळी घडली. शुभम धोंडीराम हरणे (वय 19, रा. गडबिद्री) असे आहे. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे.
मयताची बहीण कु. आकांक्षा धोंडीराम हरणे (वय 21) हिने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 7.00 ते 7.45 वाजण्याच्या दरम्यान शुभमने काहीतरी मनावर घेऊन घरातील लोखंडी पाईपला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला. त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तो मृत झाल्याचे घोषित केले.