आत्तापर्यंत सांगली जिल्ह्याचा विकास झाला नाही काय ?… सुभाष खोत.

आत्तापर्यंत सांगली जिल्ह्याचा विकास झाला नाही काय ?… सुभाष खोत.
सिंहवाणी चीफ ब्युरो / तासगाव
ज्यांना पक्ष बदलायचा आहे त्यांनी एकच कारण सांगतात मला सांगलीचा विकास करायचा आहे मग भाजपचे आमदार. माजी खासदार. मंत्री पालकमंत्री भाजपचे नेते गेल्या दहा वर्षांमध्ये काय करीत आहेत त्यांनी काही केलं नाही म्हणून तुम्ही पक्षांतर करून थांबलेला विकास करण्यासाठी तुम्ही जात आहात काय असा खडा सवाल सुभाष खोत माझी सभापती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना विचारलेला आहे.
स्वर्गीय वसंत दादा. स्वर्गीय राजारामबापू. स्वर्गीय मोहनराव बाबा शिंदे. स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम स्वर्गीय आर आर पाटील आबा. स्वर्गीय मदन भाऊ पाटील. स्वर्गीय प्रकाश बापू पाटील. स्वर्गीय विष्णू अण्णा पाटील हे नुसते आमदार खासदार होऊन गेले काय या लोकप्रतिनिधी काहीच केलं नाही काय म्हणून तुम्ही पक्षांतर करून विकास करायला चाललाय.
गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये केंद्रात आणि राज्यात एकांची सत्ता असताना जिल्ह्यामध्ये तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कुठली मोठी कारखानदारी या ठिकाणी आली आहे?.
स्वर्गीय वसंतदादांनी. स्वर्गीय राजारामबापू ने या जिल्ह्यामध्ये मोठे कारखानदारी उभी केली मिरज एमआयडीसी असेल कुपवाड एमआयडीसी असेल. साखर कारखानदारी असेल असे अनेक उद्योग या जिल्ह्यांमध्ये आणून संपूर्ण देशामध्ये सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक केलं मग तुम्ही आता पक्षांतर करून काय विकास करणार आहे जनतेला सांगा फालतू कारणे सांगू नका.
2014 साला पूर्वी या भारतीय जनता पार्टीने विकास कामासाठी कुठला फंड दिला होता आणि देश स्वातंत्र्यासाठी या भारतीय जनता पार्टीने काय काम केलं होतं या सर्वांचं उत्तर आहे आपल्या तेच गद्दार माणसं या भारतीय जनता पार्टीला काहीही न करता 2014 स*** सत्तेवर बसवले मग आता तुम्ही कुठला विकास करणार आहे हा प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे .
आपण फक्त न फक्त स्वार्थासाठी पक्षांतर केलेलं आहे आपलं काहीतरी साधून घेण्यासाठी आणि ते तिकडे गेले म्हणून मी बी तिकडे जाणार आणि ज्या पक्षात आपण गेलेला आहात त्या पक्षाचं वाटोळ कसं होईल हेच पाहणार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माझी विनंती आहे अशा दल बदलू लोकांपासून सावध राहा अन्यथा एक दिवस आपल्याला सुद्धा काँग्रेस पक्षासारखी अवस्था झालेली दिसेल असा इशाराही शेवटी सुभाष खोत यांनी दिला आहे.