तिसंगी चे अर्जुन खिलारे यांना निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार प्रदान.

तिसंगी चे अर्जुन खिलारे यांना निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार प्रदान.
सिंहवाणी ब्युरो / तासगाव
तिसंगी गावचे सुपुत्र अर्जुन खिलारे यांना महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज सांगली यांच्यामार्फत दिला जाणारा निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.रविवारी मिरज येथे झालेल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात माननीय श्री प्रमोद मुतालिक संस्थापक अध्यक्ष श्रीराम सेना , मा.राजेंद्र कांबळे मुख्य संपादक महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज यांच्याहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान आला.
स्व.आर.आर.आबा पाटील यांच्या निधनानंतर अनेकांनी पक्ष बदलले मात्र अर्जुन खिलारे हे त्यांच्या कुटुंबाशी एकनिष्ठ राहिले त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी माजी आमदार श्रीमती सुमनताई आर.पाटील यांच्यासोबतही यांनी आपली निष्ठा कायम ठेवत आपले कर्तृत्व सिद्ध केले आता आमदार रोहित आर आर पाटील यांच्याशीही ते एकनिष्ठ राहून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहेत. याची दखल घेऊन त्यांना निष्ठावंत कार्यकर्ता हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक मा.संजय भोकरे (वस्ताद) महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.सिद्धार्थ भोकरे, लोकमत न्यूज च्या अँकर श्वेता मडके आदी मान्यवर उपस्थित होते.