स्वातंत्र्य दिनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात अनोखे आंदोलन “जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” – घोषणांनी गारगोटीचा शिवार दणाणला;

स्वातंत्र्य दिनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात अनोखे आंदोलन
“जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” – घोषणांनी गारगोटीचा शिवार दणाणला;

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य दिनी देशभक्ती आणि हक्कसंघर्षाचा संगम घडवून आणत एक अनोखे आंदोलन केले. 15 ऑगस्ट रोजी गारगोटी तालुका भुदरगड येथील बाधित शिवारामध्ये माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी भुदरगड तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची”, “एकच जिद्द – शक्तीपीठ रद्द” अशा घोषणांनी संपूर्ण शिवार दणाणून गेला.

शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत स्पष्ट इशारा दिला – “काहीही झालं तरी शक्तीपीठ महामार्ग शेतातून जाऊ देणार नाही. सरकारनं कितीही रुपयाचं आमिष दाखवलं तरी आम्ही पैसे घेणार नाही, आम्हाला आमची शेती हवी आहे.”
ध्वजारोहणानंतर सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेतल्या व त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. विकासाच्या नावाखाली जमीन बळकावणे, याला शेतकरी प्रचंड मोठा विरोध दर्शवणार असल्याचे स्पष्ठ केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, राहुल देसाई जीवन पाटील, सम्राट मोरे, सचिन घोरपडे, मधुआप्पा देसाई, शामराव देसाई, मच्छिंद्र मुगडे, सरपंच प्रकाश वास्कर, शिवराज देसाई, शंभूराजे देसाई, रामभाऊ कळबेकर, नंदकुमार मोरे, शेतमालक दौलत शिंदे, दीपक देसाई, म्हसवे गावचे शरद देसाई, अनिकेत देसाई, बजरंग साळवे यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते