जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी : प्राचार्य मिलिंद पांगिरेकर

जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी : प्राचार्य मिलिंद पांगिरेकर
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय वयातच ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि परिश्रम घेण्याची तयारी ठेवायला हवी, असे उदगार प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी काढले.
गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालय येथे इ.११ वी विद्यार्थी स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर होते.
यावेळी बोलताना श्री.पांगिरेकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत.
यावेळी इ.११ वी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. गतवर्षी बारावी परीक्षेत गुणाानुक्रमे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले.
यावेळी साक्षी नाईक, अमोली अडसुळे, सानिका गुरव, दिव्या बेलेकर, शर्वरी फराकटे, मृणाल माने, भूमिका पाथरवट, नेहा भारमल , मानसी भारमल, किरण यमगेकर, प्रणाली सुतार, प्रियांका शिंदे आदी विद्यार्थ्यांनी तर प्रा.सौ.स्नेहा साळोखे, प्रा.श्री.विजयकुमार घुंगरे -पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रा.सौ.रोहिणी निकम, प्रा.लता देसाई यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक कु.जान्हवी सुतार हिने, आभार कु.आरती शिऊडकर हिने तर सूत्रसंचालन कु.शर्वरी फराकटे हिने केले.