तरुणांनी तासगावचा वैभवशाली इतिहास व परंपरा अभ्यासावी – राजेंद्र पटवर्धन

तरुणांनी तासगावचा वैभवशाली इतिहास व परंपरा अभ्यासावी – राजेंद्र पटवर्धन
सिंहवाणी ब्युरो / तासगाव (प्रतिनिधी)
मराठी साम्राज्याचा गौरवशाली इतिहास युवकांनी समजून घ्यावा. तरुणांनी तासगावचा वैभवशाली इतिहास व परंपरा अभ्यासावी असे उद्गार परशुराम भाऊ पटवर्धन यांचे वंशज व श्री गणपती पंचायतन तासगाव चे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय,तासगाव येथे इतिहास विभाग अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि श्री गणपती पंचायतन तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘तासगावचा वैभवशाली इतिहास’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी बोलताना काढले.त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ते परशुराम भाऊ पटवर्धन असा जाज्वल्य इतिहासाचा आढावा घेतला.परशुराम भाऊंनी केलेल्या लढायात तासगावच्या इतिहासातील सोनेरी पाने आहेत. ती पाने प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत.असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.तसेच तासगावचे ऐतिहासिक,भौगोलिक, आर्थिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.तसेच परशुराम भाऊ पटवर्धन यांच्या पराक्रमाबद्दल सांगत असताना परशुराम भाऊंचा प्रेमळपणा व गणपतीची भक्ती याविषयी माहिती देवून गणपती मंदिराच्या स्थापनेपासून गणपती मंदिर बांधत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली आणि गणपती मंदिरावर कोणत्या शैलीचा प्रभाव आहे.याचा ओघवत्या शैलीत आढावा घेवून रथोत्सवाला सर्वांनी येण्याचे आवाहन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी विद्यार्थ्यांना इतिहासाबद्दलची जाणीव करून देली.भविष्यामध्ये जर काही गोष्टी चांगल्या करायच्या असतील तर आपण इतिहासामध्ये डोकावून पाहिलं पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा.पल्लवी मिरजकर यांनी केले तर आभार प्रा.रणजीत कुंभार यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमाला उपप्राचार्य जे.ए.यादव,ज्युनियर विभाग प्रमुख एस.डी.पाटील,श्री गणपती पंचायतन तासगाव चे दिवानजी पवन कुडमल,मुख्य पुजारी अथर्व जोशी,समीर यादव,राजेंद्र पाटील,महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक महाविद्यालयातील, प्रशासकीय कर्मचारी,विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.